Friday, March 29, 2024

Latest Posts

भरत जाधव पुन्हा भडकले आणि घेतला मोठा निर्णय

मराठी चित्रपट दर्जेदार असून देखील त्यांना आपल्याच राज्यात स्क्रीन्स मिळत नाहीत ही तक्रार मराठी निर्मात्यांची असते.परंतु आता नाट्यकर्मींची देखील तशीच काहीशी अवस्था झालेली पाहायला मिळतेय.

मराठी चित्रपट दर्जेदार असून देखील त्यांना आपल्याच राज्यात स्क्रीन्स मिळत नाहीत ही तक्रार मराठी निर्मात्यांची असते.परंतु आता नाट्यकर्मींची देखील तशीच काहीशी अवस्था झालेली पाहायला मिळतेय. आणि हि महाराष्ट्रासारख्या राज्यात खुप दुर्दैवी बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून याबद्दल सतत वाद पाहायला मिळत आहेत. यावर आता राज्याच्या सांस्कृतिक खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक नुकतंच पार पडली. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी AC नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा”, असं म्हणत भरत जाधवांनी प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं म्हणत भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली.

भरत जाधव हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. भरत जाधव सध्या मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. पण रत्नागिरीत भरत जाधव यांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान भीषण अनुभव आलाय.अभिनेता भरत जाधव यांनी केली जाहिर नाराजी व्यक्त रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव झाला नाराज. नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही. भरत जाधवांचा काल रात्री होता तू तू मी मी हा नाट्यप्रयोग रत्नागिरीत होता. त्यावेळी AC आणि साउंड सिस्टीम नसल्याने भरत जाधव नाराज झाले आहेत.भरत जाधव यांनी याआधी सुद्धा नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठवला आहे. भरत जाधव सध्या तू तू मी मी नाटकात काम करत आहेत. या नाटकात भरत जाधव सोबत कमलाकर सातपुते, ऐश्वर्या शिंदे, रुचिरा जाधव, निखिल चव्हाण असे कलाकार झळकत आहेत.केदार शिंदे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. या नाटकाचे सध्या महाराष्ट्रभर प्रयोग होत आहेत. आता भरत जाधव यांनी यापुढे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही, या घोषणेचे पुढे कसे प्रतिसाद उमटतात हे पाहणं चर्चेचा विषय आहे.

हे ही वाचा:

पुन्हा एकदा उर्वशी रौतेला झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

नरहरी झिरवळांचा एक वेगळाच अंदाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss