प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर नुकत्याच झालेल्या चाकू हल्ल्याने एक खळबळ उडाली आहे. संतापलेल्या चोराने सैफवर सपासप चाकूने ६ वर केले ज्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचं पथक स्थापन करण्यात आलं आहे. चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सैफ अली खानला भोपाळच्या राजघराण्यातील भोपाली नवाब म्हणून ओळखले जातं. भोपाळमध्ये त्यांची अब्जावधींची मालमत्ता आहे, जी त्यांच्या शाही वारशाचा आणि कौटुंबिक वारशाचा भाग आहे. सध्या बराच चर्चेत असलेल्या सैफचं वादांशी जुनं नातं आहे. अनेक वेळा तो वादात सापडला आहे. तर भोपाली नावाबाकडे काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या वादात तो सापडला आहे बघुयात…
भोपाळची राजधानीत अब्जावधींच्या मालमत्तेचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाकडे हजारो एकर जमीन आहे, ज्यामध्ये जुन्या भोपाळच्या अर्ध्याहून अधिक जमीन आणि आजूबाजूच्या जंगलांचा समावेश आहे. ही मालमत्ता केवळ त्याच्या चित्रपटांमधून मिळवलेल्या संपत्तीचा एक भाग नाही तर ती त्याच्या राजघराण्याच्या वारशाचे प्रतीक आहे. सैफ आणि त्याचे कुटुंब या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी अनेकदा भोपाळला येतात. यासोबतच या मालमत्तेबाबत अनेक वाद सुरू आहेत, ज्यांच्या निराकरणासाठी त्यांना वेळोवेळी न्यायालयात जावे लागते.
सैफ अली खानची मोठी मुलगी सारा अली अनेकदा भोपाळला भेट देते आणि औकाफ-ए-शाहीच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी येथील न्यायालयात हजर राहते. हे कुटुंब केवळ स्वतःच्या इस्टेटची काळजी घेत नाही तर अनेक ऐतिहासिक मालमत्ता आणि साम्राज्यांच्या जीर्णोद्धारात देखील सहभागी आहे. हे सर्व असूनही, या मालमत्तेवरील वाद कधीच कमी होताना दिसत नाही आणि हे कुटुंब नेहमीच चर्चेत असते.
भोपाळमध्ये आणखी एक अब्ज किमतीची मालमत्ता आहे, जी फ्लॅग हाऊस म्हणून ओळखली जाते. याच संपत्तीबद्दल न्यायलयात वाद सुरु आहेत. फ्लॅग हाऊसमध्ये नवाबी काळातील ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये नवाबी काळातील अनेक प्राचीन वस्तू आहेत, ज्या त्यांच्या ऐतिहासिक मूल्यामुळे खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तथापि, कालांतराने अनेक नातेवाईकांनी मालमत्ता काढून घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मालमत्तेचा वाद आणखी वाढत गेला . या फ्लॅग हाऊसची किंमत एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढते.
सैफ अली खानच्या कुटुंबाची शाही मालमत्ता असलेला पतौडी पॅलेस देखील खूप प्रसिद्ध आहे. ही मालमत्ता आता हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित झाली आहे. पतौडी पॅलेसची किंमत सुमारे 800 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. हा राजवाडा केवळ एक ऐतिहासिक वारसा नाही तर आजकाल पर्यटकांसाठी आणि बॉलिवूड चित्रपटांसाठी आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र बनला आहे. आतापर्यंत पतौडी पॅलेसमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झालं आहे. मंगल पांडे, वीर झारा, रंग दे बसंती आणि लव्ह सारखे मोठे चित्रपट या पॅलेसमध्ये या चित्रपटांची शुटींग झाली आहे.
सैफ अली खानच्या कुटुंबाचे अनेक हवेली आणि बंगले बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसतात. विशेषतः हरियाणातील पतौडी पॅलेसचा वापर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी केला जातो. याशिवाय, चिकलोड कोठी हे आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालं आहे. या हवेल्या आणि राजवाड्यांचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व त्यांना चित्रपटांसाठी आदर्श स्थान बनवते. ही ठिकाणे नवाबी राजघराण्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जिवंत ठेवतात.
सैफ अली खान कोणत्या – कोणत्या वादात सापडला आहे
हम साथ साथ है सिनेमादरम्यान सलमानने काळवीटाची शिकार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सैफ अली खानचा नाव देखील जोडण्यात आलं होत. अजूनही हे प्रकरण कोर्टात सुरु आहे.
तर 2012 साली सैफ अली खान त्याच्या कुटुंबासोबत एका फाईव्ह स्टार हॉटेलेमध्ये गेला असताना वाद झाला होता. तेथे साऊथ अफ्रिकेवरून आलेल्या एका बिझनेस मॅनशी त्याचा वाद झाला होता. तेव्हा सैफने वादात त्याला मारहाण देखील केली होती. या नंतरही सैफ याला पोलिस केसला सामोरं जावं लागलं होतं.
तसेच काही वर्षांपूर्वी सैफ अली खान याला तांडव या वेब सीरीजमुळे ही वादाला सामोरं जावं लागलं होतं. हिंदू संघटनांनी यामध्ये दाखवलेल्या काही दृष्यांना विरोध केला होता. त्यावेळेस सैफ आणि वेब शोच्या टीमने माफी सुधा मागितली होती …
आधिपुरुष या चित्रपटात सैफ अली खान रावणच्या भूमिकेत सापडला होता. अभिनेता आणि चित्रपट निर्मात्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप एका वकिलाने केला होता. सैफ आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये खटला दाखल करण्यात आला होता. अश्या अनेक वादात तो सापडला.
सैफ अली खानवर धारधार शश्त्राने वार करण्यात आला. सैफ अली खानवर 6 वार करण्यात आले असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम खानने सैफला रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली. हात आणि पाठीवरही वार करण्यात आला आहे. पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आले असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या आधारे त्याची ओळखही पटली आहे. या हल्लेखोराच्या नावावर या आधीही घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केल्याचंही समोर आलं आहे. सैफ अली खानवर करण्यात आलेला हल्ला हा केवळ चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्याला घरातील कुणी नोकराने मदत केली होती, किंवा या हल्ल्यामागचा दुसरा कोणता उद्देश होता या चर्चांना आता ब्रेक लागला आहे.
हे ही वाचा :
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली…
अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .