Wednesday, April 24, 2024

Latest Posts

बॉलीवूडच्या खिलाडीने दिली केदारनाथ मंदिराला भेट

बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटाने देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अक्षय कुमार होणेकडं कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत असतो.

बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटाने देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अक्षय कुमार होणेकडं कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत असतो. अक्षय कुमारसाठी मागील अनेक दिवस त्याचे काही खास नव्हते. मागील दिवसांमध्ये त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चालले नाही मग ते बच्चन पांडे असो किंवा रक्षाबंधन नाहितर आत्ताच रिलिज झालेला सेल्फी. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. परंतु अक्षय कुमार आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

अक्षयने २३ मे रोजी केदारनाथ मंदिराला भेट दिली. त्याचे केदारनाथचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडीओ मध्ये अक्षय त्या मंदीरात फिरत आहे आणि मंदिराबाहेर हात जोडून फिरताना दिसत आहे. एएनआयने अक्षय कुमारचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारने त्याच्या कपाळावर टिका लावला आहे. त्यामध्ये अक्षय कुमारने काळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट पँट मध्ये तो दर्शन घेत आहे त्याचबरोबर तो दोन्ही हात जोडून तो चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. मंदिरामध्ये असताना त्याचे चाहते त्याच्याभोवती जमले होते. त्याने अनुयायांसह ‘हर हर महादेव’ चा जयघोष केला आहे.

त्याचबरोबर अक्षय कुमारचे केदारनाथ मंदिरातील काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जय बाबा भोलेनाथ’. त्याचबरोबर केदारनाथ धामच्या वादकांचा आनंद घेताना अक्षय कुमार दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय कुमार त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला पोहोचला आहे. त्यांनतर तो हेलिपॅडवरून केदारनाथला पोहोचला.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss