Vicky Kaushal Chhaava Box Office Collection: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालत आहे. विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटांना मागे टाकत ३१ कोटींचा गल्ला जमवला. तर तीन दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. ३१ कोटी रुपयांची ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने तीन दिवसांत १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट (Chhaava Movie) सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘छावा’नं बॉक्स ऑफिसवर (Chhaava Movie Box Office Collection) जबरदस्त कमाई केली आहे. ३१ कोटींची ओपनिंग करणाऱ्या या हिस्टॉरिकल फिल्मनं फक्त आणि फक्त तीनच दिवसांत ११७ कोटींचा आकडा पार केला आहे. विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत खूप प्रेम मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवरचं ‘छावा’चं वादळ कुणीच रोखू शकणार नाही, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात विक्की कौशलनं भूमिकेला न्याय दिल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून ऐकायला मिळत आहेत. तसेच, विक्कीसोबतच मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत झळकलेल्या अक्षय खन्नावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचप्रामणे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या चित्रापटाच्या माध्यमातून घराघरांत पोहचला आहे.
विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानं तीन दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत खूप प्रेम मिळालं. विक्कीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘छावा’ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. स्वतःचा विक्रम मोडण्यासाठी त्याला २५० कोटी रुपये कमवावे लागतील. अशातच आता ‘छावा’नं २००० कोटींच्या चित्रपटासह शाहरुख-सलमान खानचा विक्रमही अगदी सहज मोडला आहे.
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘छावा’ हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट आहे, ज्याला इतका अद्भुत प्रतिसाद मिळाला आहे. ‘छावा’ची गर्जना केवळ देशातच नाहीतर, परदेशातही ऐकत आहे. तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांची यादीही जाहीर झाली आहे. विकी कौशलचा ‘छावा’ ४८. ५ कोटी रुपयांची कमाई करून पाचव्या स्थानावर आला आहे. तर या यादीत आमिर खानचा २००० कोटींचा ‘दंगल’ बाराव्या क्रमांकावर आहे. जरी हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असला तरी तिसऱ्या दिवशी तो ‘छावा’ पेक्षा मागे पडला. दंगलनं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी भारतातून फक्त ४१. ३४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या यादीत विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटामागे अनेक चित्रपट आहेत. जिथे सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ आठव्या क्रमांकावर आहे. तर शाहरुख खानचा ‘पठाण’ 17 व्या क्रमांकावर आहे. ‘छावा’समोर ‘टायगर 3’ आणि ‘बजरंगी भाईजान’ही टिकू शकले नाहीत. एवढंच नाही तर ‘बाहुबली 2’ आणि रणबीर कपूरचा ‘संजू’ देखील विक्कीच्या मागे आहे. तिसऱ्या दिवशी ज्या ४ फिल्म्सचा विक्की कौशल रेकॉर्ड मोडू शकला नाही, त्यामध्ये ‘पुष्पा २’, जवान, एनिमल आणि गदर २ चा समावेश आहे. तसेच, ‘छावा’ अक्षय खन्नाची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म बनली आहे. ज्याने तीन दिवसांत ११७ कोटींचा गल्ला कमावला आहे.