Friday, April 19, 2024

Latest Posts

सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री दीदींच्या घरी प्रभादेवी पोहोचले

काल ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

काल ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मायेची पाखर गळणारी घालणाऱ्या सुलोचना दीदी यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. सर्वांच्या लाडक्या आणि आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीचा काळ गाजवणाऱ्या आणि गुरु स्थानी असणाऱ्या सुलोचना दीदींचे रविवारी निधन झाले.वृद्धापकाळ आणि श्वसनाचे आजार यामुळे त्यांचे दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुलोचना दीदी यांच्या उपचाराचा खर्च राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्याच बरोबर रुग्णालयामध्ये ३ लाख रुपये देखील जमा करण्यात आले होते. आज सोमवार ५ जून रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी प्रभादेवी येथे आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचे अंत्य दर्शन घेतले.

सुलोचना दीदी यांच्या निधनाची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री थेट दिल्ली दौऱ्याहून परत थेट प्रभादेवी येथील सुलोचना लाटकर यांच्या घरी गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना मानसिक धीर दिला.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss