spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

अभिनेता अमीर खान प्रेमाविषयी भाष्य करताना म्हणाला, मी किती रोमँटिक आहे…

साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या आजच्या प्रॅक्टिकल जमान्यात अभिनेता अमीर खानने मी किती रोमँटिक’ या प्रश्नावर उत्तर दिलं आणि अनेक तरुण मंडळींनाही लाजवेल असं काहीतरी बोलून गेला. प्रेमाला वय नसतं, प्रेम हे आंधळं असतं, अशा अनेक सुरस, गोड गोड किंवा प्रेमवेड्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची कन्या खुशी कपूर यांच्या ‘लवयापा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंट नुकताच पार पडला. या चित्रपटासाठी आमिरने दोघांचेही अभिनंदन केले. या चित्रपट लॉन्चिंग इव्हेंट दरम्यान अमीर खान प्रेमाबद्दल बरंच काही बोलून गेला.

आमिर खानने प्रेमावर आपले मत व्यक्त्त केले आहे. प्रेमाविषयी बोलताना, खऱ्या आयुष्यात मी खूप रोमँटिक आहे. हे तुम्ही माझ्या दोन्ही एक्स पत्नींना विचारू शकता. म्हणूनच माझे सर्व आवडते सिनेमे रोमँटिक आहेत. मी रोमँटिक सिनेमांमध्ये हरवून जातो. माझा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे. आयुष्यात आपण पुढे जात जातो, तसतशी आपली प्रेमाबद्दलची समज वाढत जाते. जसजसा मी मोठा होत आहे, तसतसे माझ्यात काय त्रुटी, चुका आहेत हे माझ्या लक्षात आले आहे आणि मी ते सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. कुछ होश नहीं रहता कुछ ध्यान नहीं रहता इंसान मोहब्बत में इंसान नहीं रहता … असं म्हटलं जातं. हे अभिनेता अमीर खानच्या बाबतीत लागू होत असा म्हणायला हरकत नाही.

लवयापा’ हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान व खुशी कपूर या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच १० जानेवारीला झाला आहे. या इव्हेंटमध्ये आमिर भावूकही होताना दिसला. आशुतोष राणा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात जेन-झेड जोडप्याची लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

Valmik Karad नंतर आता मुलगा सुशील अडचणीत !

इंस्टाग्राम स्टोरीमुळे Ravindra Jadeja चर्चेत चॅम्पियन्स ट्रॉफीआधी करणार अलविदा !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss