spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

L&T अध्यक्षांच्या काम करण्याच्या इच्छेवर Deepika Padukone ची संतप्त प्रतिक्रिया

दीपिका पदुकोणने एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सुब्रह्मण्यम यांनी अलीकडेच एक विधान केले होते की कर्मचाऱ्यांनी रविवारीदेखील काम करावे.

दीपिका पदुकोणने एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सुब्रह्मण्यम यांनी अलीकडेच एक विधान केले होते की कर्मचाऱ्यांनी रविवारीदेखील काम करावे. एस एन सुब्रमण्यम म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे. या विधानावर दीपिका संतापली आणि तिने आपला राग व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर सुब्रमण्यम यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट लिहिली आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पत्रकार फैज डिसूजाची पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, एवढ्या उच्च पदांवर असलेल्या लोकांना अशी विधाने करतात पाहणे धक्कादायक आहे. मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे.

कर्मचाऱ्यांना अलीकडेच झालेल्या संवादादरम्यान ,एस एन सुब्रह्मण्यम यांना विचारण्यात आले होते की त्यांची कंपनी अब्जावधींची असूनही ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी काम करायला का लावतात? यावर एसएन सुब्रह्मण्यम यांनी उत्तर दिले की, रविवारी त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही याबद्दल त्यांना वाईट वाटते. जर लोक रविवारी पण आराम करत असतील तर त्यांना खूप आनंद होईल. एस एन सुब्रमण्यम पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करायला हवे.

”रविवारी ऑफिसला जा, घरी किती दिवस बायकांकडे पाहत राहणार ”

ते म्हणाले, “रविवारी मी तुम्हाला कामावर आणू शकत नाही याबद्द्ल मला वाईट वाटते. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला लावले तर मला जास्त आनंद होईल. कारण मी एरव्ही काम करतो. लोकांनी रविवारी ऑफिसला जावे. ते घरी राहून काय करणार आणि किती वेळ ते आपल्या बायकांकडे पाहत राहणार”. सुब्रह्मण्यम यांचे विधान व्हायरल होत असून तेव्हापासून ते सतत चर्चेत आहेत आणि या विधानामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे.

 

Latest Posts

Don't Miss