Tuesday, May 30, 2023

Latest Posts

दीपिकाचा नो मेकअप लुक सोशल मीडियावर व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या चित्रपटामधील अभिनयाने तर ती तिच्या चाहत्यांची मने जिंकते आणि त्यांचे मनोरंजन सुद्धा करताना दिसत असते.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या चित्रपटामधील अभिनयाने तर ती तिच्या चाहत्यांची मने जिंकते आणि त्यांचे मनोरंजन सुद्धा करताना दिसत असते. ती तिचे अनेक लुक सोशल मीडियावर शेयर करत असते. तिच्या फॅशनसाठी तिला तिचे चाहते नेहमीच अव्वल स्थानावर ठेवतात. असे सांगितले जाते की ती तरुण पिढीची धडकन देखील आहे. दीपिकाच्या लूकवर तिचे चाहते नेहमीच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करत असतात.

दीपिकाने तिच्या सोशल मीडियावर नुकताच नो मेकअप लूकचा फोटो शेयर केला आहे. दीपिकाचा हा लुक पाहून तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोमध्ये तिचा पूर्ण चेहरा मात्र दिसत नाही. फोटोमध्ये तिने तिचा चेहरा टोपीने झाकला आहे. या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या कॅज्युअल ड्रेस घातला आहे. या फोटोखाली दीपिका पदुकोणने तिच्या कॅप्शनमध्ये एक सूर्याचा एक इमोजी शेअर केला असून ती सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे.

दीपिकाच्या नो मेकअप लूकबद्दल अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सने लिहिले आहे की, ‘ईस्ट ऑर वेस्ट, दीपिका पदुकोण इज बेस्ट’. तर दुसऱ्या युजर्सने टिपणी केली आहे की, ‘चेहरा है या चांद खिला है….’. दीपिकाचा डॅशिंग लुक पाहून चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आपल्या साधेपणाने ही दीपिका पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दीपिकाच्या या फोटोला अवघ्या चार तासांमध्ये ६ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. चाहत्यांच्या अनेक कॉमेंट्स आल्या आहेत.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss