spot_img
spot_img

Latest Posts

लतादीदी यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याची मागणी

गायिका लता मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांच्या नावाने आता आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

गायिका लता मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांच्या नावाने आता आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी लागणारी जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन (Vijay Singh Patwardhan) यांनी केली आहे. लतादीदी सांगलीच्या असल्यामुळे त्यांच्या नावाने सांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभे करावे अशी मागणी करण्यात आली होती.

सांगली मधील गणपती मंदिरामध्ये गणपती बापाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विजय पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत . त्यावेळी बोलताना ते म्हणाले ‘ संपूर्ण जगभरात लता दीदींचे नाव आहे. त्यांचे बालपण सुद्धा सांगलीमध्ये गेले आहे.मंगेशकर कुटुंबाची नाळ सांगलीशी जोडली गेली आहे. त्यामुळे सांगलीला त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करावे. ज्यात केवळ संगीत शिक्षणच नव्हे तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश करावा. असे विद्यापीठ झाल्यास सांगलीचे नाव या कारणासाठी पुन्हा जगाच्या नकाशावर कोरले जाईल. विद्यापीठासाठी जागेची आवश्यक आम्ही पूर्ण करू. पंचायतन अशा उपक्रमांसाठी जागा द्यायला तयार आहेत. या विद्यापीठात गोरगरीब विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शिक्षणही मिळावे, अशी मागणी विजय पटवर्धन यांनी केली आहे. मुंबई विभागाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा आहे. या जागेमध्ये भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांच आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या कामासाठी एक खास समिती स्थापन करण्यात येणार आहे. ता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

लता दीदी यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.सात दशकाहून अधिक काळ त्यांनी त्यांच्या आवाजामुळे गाजवला आहे. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. मेरी आवाज ही पहचान है,मेरे ख्वाबों में जो आए, लग जा गले,अजीब दास्तां है ये,सत्यम शिवम सुन्दरम, पिया तोसे नैना लागे रे यांसारखी सुपरहिट गाणी लता मंगेशकर यांनी गायली आहेत.

हे ही वाचा: 

पुण्यातील गणेश उत्सवात ड्रोन कॅमेऱ्याची नजर

कुणबी नोंदी शोधण्यासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

FOLLOW US

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss