अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती शूटसाठी तयार होत असताना दिसत असून सोबत अभ्यास करताना दिसतेय.
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘आझाद’ या चित्रपटातून राशा अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवतंय. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांमध्ये राशाने चांगलीच छाप सोडली आहे. तिचं पहिलं गाणंसुद्धा सोशल मीडियावर तुफान गाजताना दिसतंय. राशाचा डान्स आणि तिचे हावभाव पाहून ती भविष्यात सर्व स्टारकिड्सना तगडी टक्कर देऊ शकते. अशातच राशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये राशाच एकीकडे मेकअप सुरु आहे. तर दुसरीकडे हातात पुस्तक घेऊन ती अभ्यास करताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट राशाला सीनसाठी तयार करत आहेत. त्याचवेळी शूटिंगच्या कपड्यांमध्ये आरशासमोर बसलेली राशा लक्ष केंद्रीत करून अभ्यास करताना दिसतेय.यावेळी तिने एक विडिओ शूट केला आहे ज्यात तिला विचारले असता राशा तू शूटिंगसाठी तयार आहेस का? काय करतेय? त्यावर राशा हळूच कॅमेरात बघून हसते आणि सांगते, “मी अभ्यास करतेय. त्यावर तिला पुन्हा विचारले जाते, तुझ्या शॉटला जाण्यासाठी तू आधी अभ्यास करतेय का? त्यावर राशा सांगते, “माझ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी फक्त दहा दिवस उरले आहेत. म्हणून मी भूगोल या विषयाचा अभ्यास करतेय.”
तो व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी राशाच्या मेहनतीचं कौतुक केले आहे. तर काहींनी तिची खिल्लीसुद्धा उडवली आहे. ‘ही बारावीत आहे असं वाटत नाही. असं वाटतंय की तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय’, एकाने लिहिलंय. ‘असं वाटतंय ही अभ्यास करण्याचंही अभिनय करतेय’,तर ‘इंडस्ट्रीतत यायची इतकी घाई का आहे? आधी शिक्षण तरी पूर्ण कर’, असा सल्ला देखील नेटकऱ्यांनी राशाला दिला आहे. राशाचा पहिला चित्रपट ‘आझाद’ हा येत्या १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात राशासोबत अमन देवगणसुद्धा भूमिका साकारणार आहे.
हे ही वाचा:
शरद पवार गटातील नेत्याची जीभ घसरली, धनंजय मुंडे यांच्यावर केला हल्लाबोल म्हणाले पुरुष वेश्या…
वाल्मिक कराडचे वाईन शॉप संदर्भातील कारनाम्यांची Anjali Damania यांच्याकडून पोलखोल