टेलिव्हिजन विश्वातील सर्वात वादग्रस्त शो म्हणुन बिग बॉसकडे बघितले जाते,दरम्यान बिग बॉस 17 प्रेक्षकांचे चांगल मनोरंजन करत आहे. दरम्यान प्रेक्षक ही या शो ला चांगला प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसापासून शोमध्ये अनेक राडे आणि भांडण आणि ड्रामा पाहायला मिळाला आहे.. एकीकडे खानजादी आणि अभिषेकमध्ये प्रेमाचं नातं बहरत असताना दुसरीकडे कपलमध्ये वाद झाले. अंकिता आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत भांडताना दिसले. त्यांचे विकी आणि नीलसोबतही वाद झाले.
त्यानंतर शनिवारी वीकेंड का वार मध्ये सलमान खानने सर्वांनाच धारेवर घेतलं आहे. यावेळी सलमान खानने कतरिना कैफ सोबत घरात एंट्री मारली. यावेळी त्याने टायगर 3 चे प्रमोशन देखील केले आहे. सलमान खान आणि कतरिनाने यावेळी जोरदार डान्स केला. यासोबतच बिग बॉसच्या घरात कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची जोडी देखील दिसली. यावेळी सलमान खानने वीकेंड का वारमध्ये ऐश्वर्या शर्मा आणि मन्नारा चोप्राला त्यांच्या वागणुकीमुळे फटकारलं. त्याचबरोबर सलमान खानने ऐश्वर्याचा क्लास घेताना तिला सांगितलं की, ती नीलचा वेळोवेळी अपमान करते, त्याच्यावर ओरडते त्यामुळे नीलचा संयम तुटेल. त्यामुळे तुमच्या नात्यात कटूता येईल. पुढे सलमान म्हणतो की, तुमच्यापैकी एखाद्याला एका छोट्या गोष्टीचा राग येईल आणि तुमचे नाते तुटेल. हे माझ्यासोबत घडले आहे. सलमानने समजावल्यानंतर ऐश्वर्याने माफी मागितली आणि ती यावर काम करणार असल्याचे सांगितले. आज दिवाळीच्या दिवशी घरातून कोणत्या स्पर्धकाचा पत्ता कट होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी घरातून दोन स्पर्धक बाहेर जाणार अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस 17’ च्या चौथ्या आठवड्यात 9 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.
ज्यामध्ये ऐश्वर्या शर्मा, समर्थ जुरेल, अरुण महाशेट्टी, अंकिता लोखंडे, नावेद सोल, मनारा चोप्रा, अनुराग डोवाल, नील भट्ट आणि सनी आर्य यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे आता या दिवाळीच्या दिवशी कोण घरातून बेघर होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उस्तुक आहेत.
हे ही वाचा :
दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून
दिवाळी पार्टीत क्रिती सनॉनचा ग्लॅमरस अंदाज,फोटो व्हायरल
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.