Monday, November 13, 2023

Latest Posts

अंकिताचे पती विकी जैनसोबत कडाक्याचे भांडण,विकीने असं कृत्य केले की अंकिताला राग अनावर

टेलिव्हिजन विश्वातील ‘बिग बॉस १७’ या शो ची सध्या सगळाकडेच हवा आहे,सलमान खान होस्ट करत असलेला टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या रंजक वळणावर आहे.

टेलिव्हिजन विश्वातील ‘बिग बॉस १७’ या शो ची सध्या सगळाकडेच हवा आहे,सलमान खान होस्ट करत असलेला टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १७’ सध्या रंजक वळणावर आहे. शोमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या स्पर्धकांमध्ये जोरदार वाद,ड्रामा आणि जोरदार भांडणं पाहायला मिळतात. अशाच परिस्थितीत शोच्या आगामी भागाचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना दोन वेगवेगळ्या घरात ठेवण्यात आलंय. आधी एकाच घरात असलेलं हे जोडपं आता दोन वेगवेगळ्या घरात पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसने विकी ‘दिमाग’च्या घरात जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विकी अंकिताबरोबरच्या खोलीतून शिफ्ट होतो. यामुळे ती खूपच अस्वस्थ दिसते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये असे दिसून येते की, जेव्हा बिग बॉसला अंकिता अस्वस्थ दिसते, तेव्हा ते तिला काय झालंय, याबाबत विचारतात. नंतर बिग बॉस तिला म्हणतात की ज्या व्यक्तीच्या जाण्याने ती अस्वस्थ आहे ती व्यक्ती पुढच्या खोलीत आनंदाने नाचत आहे. हे ऐकल्यानंतर अंकिताला खूप राग येतो. त्यानंतर व्हिडीओमध्ये अंकिता विकीशी भांडताना दिसते. व्हिडिओमध्ये ती विकीला लाथ मारताना ही दिसून येत आहे. तसेच “तू माझा वापर केलास, आपलं लग्न झालंय हे तू विसरून जा,” असं अंकिता विकीला म्हणते.

अंकिता विकीला म्हणाली, ‘निघून जा. तू माझ्याशी बोलू नकोस. तुझ्यासोबत राहून मी खरंच वेडी झाले आहे. आपलं लग्न झालंय हे तू विसरून जा. आजपासून तू वेगळा आहेस, मी वेगळी आहे. तू आधीपासूनच लबाड आहेस, तू माझा वापर केला आहेस.”

दरम्यान, या एपिसोडमध्येच अनुराग डोभाल व अरुण माशेट्टीचं भांडण पाहायला मिळणार आहे. दोघांचं कडाक्याचं भांडण होतं आणि अनुराग घरातील सामानाची तोडफोड करतो. त्यानंतर बिग बॉस घरातील स्वयंपाक बंद करण्याची घोषणा करतात.आता पुढच्या भागात घरात कोणता नवा ड्रामा पाहयला मिळणार हे बघणं औस्तुकत्तेचं ठरणारं आहे.

Latest Posts

Don't Miss