Monday, November 13, 2023

Latest Posts

प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान पुन्हा स्पॉट झाली अनुष्का,नेटकऱ्यांकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा  आणि क्रिकेटर  विराट कोहली हे सध्या बंगळुरूमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. बंगळुरूमधील विरुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा  आणि क्रिकेटर  विराट कोहली हे सध्या बंगळुरूमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. बंगळुरूमधील विरुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काला स्पॉट करण्यात आलं होतं तेव्हा यांचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अनुष्काचे बेबी बंप दिसत आहे, असं नेटकरी म्हणत होते. आता विरुष्काचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता विरुष्का गुडन्यूज कधी देणार? असा प्रश्न नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडत आहे.त्यामुळे आता अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

अनुष्का आणि विराट हे  बंगळुरूमधील त्यांच्या हॉटेलमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. नुकताच अनुष्का आणि विराट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विरुष्का हे ट्रेडिशनल आऊफिटमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का ही पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अनुष्का ही ओढणीनं बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. विरुष्काच्या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “मला वाटते की ते 2023 विश्वचषक जिंकल्यानंतर ते गुडन्यूज देतील” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “अनुष्का बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे बंगळुरूमधील दिवळी सेलिब्रेशनसाठी अनुष्का आणि विराट यांनी खास लूक केला होता. अनुष्कानं पिंक कलरचा ड्रेस, पर्पल कलरची ओढणी आणि मोकळे केस असा लूक केला होता. तर विराटनं हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

अनुष्का आणि विराट या दोघांना काही दिवसांपूर्वी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर देखील स्पॉट केले होते,तेव्हा दोघांनीही फोटोन काढण्याची विंनती कॅमेरामॅनला केली होती, आम्ही याबाबत लवकरच घोषणा करणार आहोत, असंही त्यांनी त्यावेळी सांगितले होतं. याच कारणामुळे अनुष्काच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.पण याबाबत विराट आणि अनुष्कानं अजुन कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आता विरुष्काचे चाहते  गुडन्युजची घोषणा विरुष्का कधी करणार याची वाट पाहत आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधाची हिमाचल प्रदेशात सैन्य दलासोबत दिवाळी

हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ मध्ये दिसणार आलिया भट्ट तर मुख्य भुमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss