Monday, November 13, 2023

Latest Posts

प्रभासच्या ‘सलार’ चित्रपटाचे पोस्टर लॉच,शाहरुखच्या ‘डंकी’ला देणार टक्कर

बाहूबली स्टार प्रभास हा त्याच्या आगामी ‘सलार’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे.दरम्यान काही महिन्यांपुर्वी प्रभास आदिपुरुष सिनेमाच्या माध्यमातुन प्रभु श्रीरामाच्या भुमिकेतुन भेटीला आला.

बाहूबली स्टार प्रभास हा त्याच्या आगामी ‘सलार’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे.दरम्यान काही महिन्यांपुर्वी प्रभास आदिपुरुष सिनेमाच्या माध्यमातुन प्रभु श्रीरामाच्या भुमिकेतुन भेटीला आला. आदिपुरुष या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर आपली छाप सोडण्यास अयशस्वी झाला.

दरम्यान आता प्रभासचे चाहते त्याच्या नविन चित्रपटासाठी आतुर झाले आहेत,चाहत्यांना आशा आहे की ,प्रभासचा हा चित्रपट त्यांच्या पसंतीस उतरेल.याचदरम्यान आता सलार या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रभासने आज दिवाळीनिमित्त सलारविषयी मोठी घोषणा केलीय. प्रभासने काही वेळापुर्वीच सोशल मीडियावर त्याच्या सलार संबंधी मोठी अपडेट शेअर केली. सलार पुढच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात भेटीला येतोय. सलार रिलीज व्हायला अवघे दोन महिने बाकी असताना सिनेमाचा टीझर, ट्रेलर काहीच समोर आला नाही म्हणुन प्रभासच्या चाहत्यांमध्ये सोशल मिडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

अखेर आज दिवाळीनिमित्त प्रभासने त्य़ाच्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. १ डिसेंबरला ७ वाजून १९ मिनिटांनी सलारचा ट्रेलर भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते एकदम खुश झाले आहेत.

सलार पार्ट १ मधील ते सीन्स देखील हॉलीवूडच्या चित्रपटांशी बरोबरी करणारे आहेत असे म्हटले जात आहे. KGF फेम प्रशांत नील यांनी सलारचे दिग्दर्शन केले असून त्यांनी हा चित्रपट इंटरनॅशनल लेव्हल स्टाईलमध्ये करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

सलारच्या टीमनं यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आहे. मेकर्सनं प्रेक्षकांना हा चित्रपट कसा भावेल याकडे लक्ष दिले आहे. याविषयी प्रॉडक्शनमधील एकानं दिलेल्या माहितीनुसार, सलार मधील एक सीन शूट करण्यासाठी ७५० हून अधिक वाहनांचा वापर केला गेला आहे.

प्रभासचा सलार पार्ट १ सीजफायर हा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रभास बरोबरच सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट प्रभासच्या करिअरमधील महत्वाचा चित्रपट ठरणार आहे. असे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे.

याशिवाय हा सिनेमा शाहरुख खानच्या डंकीशी स्पर्धा करणार हे उघड आहे. आता त्यांच्या ‘सालार’ या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि रिलीजची डेट जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रभासच्या ‘सालार’ची आता बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाशी टक्कर होणार आहे.त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा ‘डंकी’ की प्रभासचा ‘सलार’ कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली दमदार बॅटिंग करणार हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

पोस्टर फाडणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्यांना मनोज जरांगेंकडून कारवाईची मागणी

उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss