सध्या देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे.सर्व सामान्यापासून तर कलाकारांपर्यंत सर्वच आपआपल्या पद्धतीनुसार या सणाचा आनंद घेत आहे. दरम्यान आता बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही दिवाळी पार्टी सुरु आहे. अनेक कलाकार आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फोटो शेयर करत आहेत. त्यातच आता करिना कपुर आपल्या कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा करत आहे. सध्या बेबोच्या घरातही दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे.
यातच करिनानं सोशल मिडियावर या सेलिब्रेशनचे काही फोटो शेयर केले आहे. ज्यात करिना तिच्या घरी मुलांसोबत दिवाळीची रांगोळी काढण्याची व्यस्त आहे.यावेळी जेह आणि तैमूर देखील आपल्या आईला रांगोळी काढण्यासाठी मदत करत आहेत.आणि करिना,जेह,तैमूरची काढलेली बघुन सैफ अली खान पुर्ण पणे चक्रवला आहे.करीनाने इंस्टाग्राम हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात जेहने रांगोळी काढताना सर्वत्र रंग जमीनीवर पसरवले आहेत आणि जेह रांगोळीच्या रंगाने पुर्ण भरलेला दिसत आहे.
हे गंमतीशीर फोटो शेयर करत बेबोनं एक मजेदार कॅप्शन देखील शेअर केले आहे.ज्यात तिने लिहिले की, “अय्यो, जेव्हा कुटुंबाला रांगोळी काढायची असेल… किंवा होळी खेळायची असेल , काही कल्पना नाही…पण महत्त्वाचं म्हणजे आम्ही मजा केली… उत्सव सुरू झाला आहे.. सर्वांना प्रेम..”सध्या हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. नेटकरींनी या फोटोंना पाहिल्यानंतर खुप हसत आहे. बेबोच्या पोस्टवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.करीनानं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “ही दिवळी आहे की होळी?” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “तैमूरने सगळ्यात चांगली रांगोळी काढली आहे त्याला बेस्ट रांगोळीचा पुरस्कार मिळायला हवा”
दरम्यान करीना ही लवकरच ‘सिंघम 3’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती अवनी बाजीराव सिंघम ही भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘सिंघम 3’ या चित्रपटामधीलकरीनाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. या फोटोमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग पाहायला मिळत आहे. प्रेक्षक करीनाच्या या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हे ही वाचा :
Narak Chaturdashi ला नरकासुराचा वध का करतात? जाणून घ्या…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.