बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी ‘डंकी’ (Dunki) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे.या सिनेमामुळे शाहरुख अधिक चर्चेत आहे. नुकतात या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे.दरम्यान हे पोस्टर चाहत्यांच्या चांगल्याचं पसंतीस उतरला आहे. प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच आता दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2023) ‘डंकी’ या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
शाहरुख खानच्या ‘डंकी’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासंबंधित नवनवे अपडेट्स जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता दुप्पट वाढली आहे.
शाहरुख खानने ‘डंकी’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख खान स्कूटरवर बसलेला दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्न (Tapsee Pannu) आणि विक्रम कोचरदेखील आहेत. तर त्यांचा तिसरा मित्र सायकलवर आहे. ‘डंकी’ सिनेमाचं पोस्टर शाहरुख खानने शेअर केलं आहे. या पोस्टवर “आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करा”, असं लिहिलेलं दिसत आहे. पोस्टर शेअर करत किंग खानने लिहिलं आहे,”कुटुंबाशिवाय दिवाळी कशी साजरी होणार? नव्या वर्षाची सुरुवात कशी होणार? एकत्र असण्यात आणि एकत्र सण साजरे करण्यात खरी मजा आहे. ‘डंकी’चं एक वेगळं विश्व आहे”.
शाहरुख खानच्या पोस्टरवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे,”डंकी’ 1000 कोटींचा गल्ला जमवेल”, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे,”मित्रांची गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, जवान आणि पठाणचा रेकॉर्ड मोडणार डंकी, शाहरुखच्या डंकीची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathaan) आणि ‘जवान’ (Jawan) या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या दोन्ही सिनेमांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. ‘डंकी’ हा सिनेमा नाताळाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे.त्यामुळे शाहरुखच्या या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक उस्तुक असलेलं दिसून येतं आहे.
हे ही वाचा :
नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा ‘फ्रेम’, पत्रकारांच्या जगण्यावर भाष्य करणारा सिनेमा
IND vs NED, नेदरलँड्स विरुद्ध या ३ खेळाडूंना मिळू शकते विश्रांती…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.