बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान चा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट आज प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावर अनेक चांगले प्रतिक्रिया आणि कौतुक करत आहेत. टायगर-3 हा चित्रपट प्रदर्शित होताच सलमानच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये सलमानचे चाहते फटाक्यांची आतषबाजी करत थिएटरबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत.
ढोल वाजवून आणि फटाक्यांची आतषबाजी करुन सलमानच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला आहे. सोशल मीडियावर जबलपूर, भुवनेश्वर आणि विविघ ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये थिएटरबाहेर सलमानचं मोठं पोस्टर देखील लावलेलं दिसत आहे. या पोस्टरला चाहत्यांनी फुलांचा हार घातलेला दिसत आहे. सलमानच्या अनेक चाहत्यांनी थिएटरबाहेर डान्स करुन जल्लोष केला आहे.
सलमान खानच्या ‘टायगर 3’ या थ्रिलर चित्रपटचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या अॅक्शन सीन्सशिवाय या चित्रपटात शाहरुख खानचा देखील आहे.तसेच या चित्रपटात इमरान हाश्मीनं (Emraan Hashmi) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.या चित्रपटात इमरान हाश्मीनं हा या चित्रपटात खलनायिकाची भूमिका साकारत आहे.
‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वार’ आणि ‘पठाण’ या चित्रपटानंतर आता YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील ‘टायगर 3’ हा पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता टायगर 3 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. टायगर-3 या चित्रपटामधील ‘लेके प्रभू का नाम’ आणि रुआं या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.दरम्यान आता हा चित्रपट बॉक्स ऑफिलवर आपला किती गल्ला जमवणार हे पाहणं आता औस्तुकत्तेच ठरणारं आहे.