spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे मराठमोळी जोडी सध्या कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे मराठमोळी जोडी सध्या कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे.संपुर्ण महाराष्ट्र त्यांना दादा-वहिणी म्हणुन ओळख देतो.आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश आणि जिनिलिया यांचीच चर्चा रंगली आहे. जेनिलिया हिने पती रितेश याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चाना उधाण आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेनिलिया हिने रितेशसाठी लिहिलेली पोस्ट दोघांच्या चाहत्यांना देखील प्रचंड भावली आहे. यामागे कारण देखील तितकंच खास आहे. रितेश देखमुख याचा वाढदिवस असल्यामुळे जेनिलिया हिने पतीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

जेनिलियानं रितेशसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश आणि जिनिलियाच्या चेहऱ्यावर स्माईल दिसत आहे. या फोटोला जिनिलियानं कॅप्शन दिलं,  “जर कोणी मला विचारावे की, “रितेश देशमुख कोण आहे? तर मी एवढेच म्हणेन की, “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य आणि तो सर्वांत महान मनुष्य माझा आहे. हॅप्पी हर्थ-डे नवरा” जेनिलियानं शेअर केलेल्या या फोटोवर रितेशनं देखील खास कमेंट केली आहे.

जेनिलियानं शेअर केलेल्या फोटोला रितेशनं कमेंट केली, “मी तुझ्यावर प्रेम करतो बायको – तू माझ्यासाठी काय आहेस, हे तुला माहित नाही. तू माझा दिवस खास बनवतोस. तू माझे आयुष्य खास बनवतोस” रितेशच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान जेनिलिया हिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील रितेश याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 

 2002 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जेनिलियानं काम केलं आहे. ‘तुझे मेरी कसम’ या  चित्रपटानंतर त्यांनी ‘मस्ती’ या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी ते विवाहबंधनात अडकले. रितेश आणि जेनिलिया यांना 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान हा मुलगा झाला. त्यानंतर 1 जून 2016 ला त्यांच्या दुसरा मुलगा राहिलचा जन्म झाला.दरम्यान ही मराठमोळी जोडी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते,आपले फनी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ते आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असता.

हे ही वाचा:

 

Latest Posts

Don't Miss