Monday, November 20, 2023

Latest Posts

‘कॉफी विथ करण’ च्या आगामी भागात वरुण आणि सिद्धार्थची मंचावर धमाल

करण जोहरचा    कॉफी विथ करण  (Koffee With Karan 8)  हा शो गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे काही एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहोत.

करण जोहरचा    कॉफी विथ करण  (Koffee With Karan 8)  हा शो गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे काही एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहोत. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी विविध किस्से सांगतात. आतापर्यत दीपिका-रणवीर,आलिया-करिना,सारा-अनन्या अशा अनेक सेलिब्रिटीनी हजेरी लावत बऱ्यांच गोष्टींची पोलखोल देखील केली आहे.कार्यक्रमच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा सोशल मीडियावर होत असते.

दरम्यान आता कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे काही मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, करण वरुण आणि सिद्धार्थचं शोमध्ये स्वागत करतो. अशातच वरुण करणला टोमणा मारतो. तो म्हणातो, “फक्त आमचे रिलेशनशिप टिकतील याची  खात्री करा” त्यानंतर वरुण आणि सिद्धार्थ हे विविध विषयांवर चर्चा करतात. अशातच वरुण हा पुन्हा करणला आणखी एक टोमणा मारतो. तो म्हणतो, “माझ्या वडिलांच्या चित्रपटातील एका कॅरेक्टरचं नाव ‘शादीराम घर जोडे’ असं होतं. पण करण जोहरचं ‘नाव करण घर तोडे’ असं आहे.”

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल देखील सांगितलं होतं. पण या एपिसोडनंतर अनेकांनी करण जोहरला ट्रोल केलं. ‘करण हा कपलमध्ये भांडणं लावतो’, असं म्हणत काही नेटकऱ्यांनी करणला ट्रोल केलं होतं.त्याचबरोबर दीपिका रणवीरवर देखील बऱ्याच जणांनी नाराजी व्यत्क केली होती.

त्यामुळेच आता वरुणनं करण घर तोडे, असं म्हणत करणला टोमणा मारला असेल, असा अंदाज नेटकरी लावत आहेत. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट आणि करीना कपूर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. आता कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि वरुण हे कोणकोणते किस्से सांगणार?कोणत्या गोष्टींचा खुलासा करणार हे पाहणं आता औस्तुक्तेच ठरणार आहे.

हे ही वाचा:

यंदाच्या ‘इफ्फी महोत्सवात,धकधक गर्ल माधुरी दीक्षितला मिळणार ‘हा’ खास पुरस्कार

भंडाऱ्यातील सभेत नेमकं काय झालं?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss