बॉलीवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या अभिनयाच्या कौशल्यातून सर्वच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या भूमिकांना अजरामर केलं. तुलनीय सौंदर्यासोबतच माधुरी दीक्षित एक अप्रतिम नृत्यांगनादेखील आहे. माधुरीची आजही तरुण पिढीत तिच्या गाण्यांची जबरदस्त क्रेझ असल्याचं पाहायला मिळते.
दरम्यान आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता माधुरीला तिच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी गौरविले जाणार आहे. ५४ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामधील महोत्सवामध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे.
केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबद्दल घोषणा केली आहे. ‘५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (IFFI) मध्ये माधुरी दीक्षितला भारतीय चित्रपटविश्वात अद्भुत आणि अविस्मरणीय असं योगदान दिल्याबद्दल विशेष पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा अनुराग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून केली. अत्यंत खास शब्दांत अनुराग यांनी माधुरीचं कौतुक केलं आहे. माधुरीनं भारतीय सिनेमा क्षेत्रात जे योगदान दिले आहे यासाठी आम्ही तिचा विशेष सन्मान करतो आहोत. यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव समारंभ होणार आहे. असेही त्या व्टिटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ माधुरीनं तिच्या अभिनयानं, सौंदर्यानं अन् नृत्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक प्रभावशाली अभिनेत्रींमध्ये माधुरीचे नाव घेतले जाते. आजवर माधुरीनं विविध पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे,त्यात आता आणखी एका पुरस्काराची भर पडणार आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवा (आयएफएफआय) च्या पाचव्या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यातील पणजीममध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीही तिथ हजेरी लावणार आहेत. केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, नुसरत भरुचा, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर आणि श्रिया सरन आदी सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत.यंदा या महोत्सवात नेमक्या कोणत्या चित्रपटांना पुरस्कार मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे ही वाचा:
रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘अॅनिमल’चा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
BJP चे बावनकुळे Casino मध्ये, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर राजकारण रसातळाला
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.