Friday, December 1, 2023

Latest Posts

बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चा ट्रेलर प्रदर्शित,सात बायकांच्या अनोख्या प्रवासाची कथा

बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.‘झिम्मा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या मनात ‘झिम्मा २’ बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमेने सात बायकांच्या पुढच्या ट्रिपची अर्थात ‘झिम्मा २’ ची घोषणा केली होती. अखेर टीझरनंतर आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘झिम्मा २’मध्ये सगळ्या बायका इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ट्रिपसाठी निघाल्या आहेत. इंदूचा वाढदिवस कसा व कुठे साजरा करायचा याची संपूर्ण जबाबदारी कबीरवर असणार आहे. कबीरची भूमिका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर साकारत आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला प्रेक्षकांना अभिनेत्री निर्मिती सावंत गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर निर्मिती आणि सुचित्राला एक पोलीस अधिकारी पकडतो आणि बायकांचा नवा खेळ सुरू होतो.यामध्ये निर्मिती सांवत यांच्या कॉमेडीने तर चित्रपटाला चार चांद लावले आहेत असं म्हणायला हरकत नाही.

यंदाच्या खेळात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन नव्या अभिनेत्री पाहायला मिळत आहे. या सात बायकांची गोष्ट प्रेक्षकांना २४ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसाशिवाय चित्रपटात अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे.इमोशन,आनंद,गंमत,दुख या सगळ्या गोष्टी शेअर करत या बायकांचा खेळ दाखवण्यात आला आहे.

‘झिम्मा २’च्या ट्रेलरमधील बरेच संवाद लक्ष वेधून घेतात. “फक्त आई होणं म्हणजे, बाई होणं नसतं बाळा…”, “मला आयुष्यात रोमान्सही नकोय…”, “बाबा गेल्यावर माझ्या आईला एखाद्या पार्टनरची गरज असेल याचा मी कधीच विचार केला नाही.”, “जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार!” त्यामुळे ट्रिपशिवाय चित्रपटात अनेक सामाजिक समस्यांवर प्रकाशझोत टाकल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येत आहे. दरम्यान, ‘झिम्मा २’ मध्ये प्रेक्षकांना सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.दरम्यान प्रेक्षक आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमध्ये पंतप्रधानांनी केला मोठा दावा, काँग्रेसला निरोप देण्याची वेळ आली…

POLLUTION: प्रदूषणात मुंबईचे स्थान कितवे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss