Monday, December 4, 2023

Latest Posts

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवा ट्विस्ट, लक्ष्मीपुजनाला प्रतिमा येणारं सुभेदारांच्या घरी

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या दिवाळीचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली-अर्जुनची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे सुभेदारांच्या घरात विशेष तयारी करण्यात येत आहे.

छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही मालिकेवर प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत.विशेष म्हणजे मालिकेतील साईली- अर्जुनवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.सध्या ही मालिका टीआरपी रेटिंग मध्ये देखील पहिल्या नंबरवर आहे.प्रेक्षक मालिका आणि मालिकेतील कलाकारांवर भरभरुन प्रतिसाद देताना दिसून येत आहेत.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या दिवाळीचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली-अर्जुनची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे सुभेदारांच्या घरात विशेष तयारी करण्यात येत आहे. पण, आता लवकरच मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सर्वांपासून आपली ओळख लपवून फिरत असलेली प्रतिमा आता सुभेदारांच्या घरापर्यंत येऊन पोहोचणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या प्रेक्षकांना आता सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य माहीत झालं आहे. प्रतिमा ही तन्वीची आई आणि पूर्णा आजीची लेक असते. नागराज आणि महिमतच्या गुंडांनी प्रतिमाला जीवे मारण्याचा कट रचल्याने एवढे दिवस ती मालिकेत सर्वांपासून आपली ओळख लपवून फिरत आहे. अखेर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रतिमा आपल्या माहेरी म्हणजेत सुभेदारांच्या घरी येऊन पोहोचते.

सायली प्रतिमाची खरी लेक असल्याने आईच्या येण्याची चाहूल तिला लागते. ती पूजा सोडून पळत-पळत दरवाजाकडे येते. एवढ्यात प्रतिमा तिच्याजवळचं नाणं रांगोळीवर ठेऊन निघून जाते. हे नाणं सायलीच्या हाती लागतं. पूर्णा आजीला लक्ष्मीचं नाणं पाहिल्यावर प्रतिमाची आठवण येते. ती उपस्थितांना हे प्रतिमाचं नाणं असल्याचं सांगते.

प्रतिमाचं नाणं रांगोळीवर पडलेलं सापडल्याने सुभेदारांना ती जिवंत असल्याची खात्री पटते. याशिवाय प्रतिमा आल्याची चाहूल सायलीला कशी लागली याबद्दल सुभेदार कुटुंबीय आश्चर्यचकित झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मालिकेचा हा विशेष भाग लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. मालिकेत प्रतिमा आणि सायली या मायलेकींची भेट केव्हा होईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.आता येणाऱ्या भागात प्रतिमा आणि सुभेदार कुटुंबियाची भेट होणार का ? दिवाळीच्या मुहुर्तावर प्रतिमा घरी येणार का ? असे सगळेच प्रश्न प्रेक्षकांना पडले असणार हे नक्की.

हे ही वाचा : 

तुमचं GMAIL ACCOUNT होणार बंद? |Your GMAIL ACCOUNT will be closed?

वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत| There are differences of opinion but no discrepancy of mind

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss