Wednesday, November 29, 2023

Latest Posts

दिवाळीसाठी कंदील खरेदी करताना हेमांगी कवीची उडाली तारांबळ

सर्वसामान्यांसोबत या सर्व प्रकारात कलाकार मंडळी सुद्धा येतात. आपल्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हे कलाकार नेहमीच उत्सुक असतात.

दिवाळीला सुरुवात झाली आहे,त्यामुळे आता सर्वांचीच खरेदीची लगबग चालू झाली आहे. एकदी वर्षभर वाट पाहून हा सण जसा जवळजवळ येत जातो तसतसे प्रत्येक घरात धावपळीला सुरुवात होते. घरातील झाडलोट, फराळाचा घाट, नवे कपडे, रांगोळी आणि महत्त्वाचं म्हणजे कंदील यांसारख्या गोष्टींमध्ये घरातील लोक व्यस्त होऊन जातात. आता बाजारपेठा सुद्धा दिवाळीच्या सामानांनी फुलल्या आहेत. आपल्याला हवे तसे आवडते सर्व प्रकार पाहण्यासाठी ते घेण्यासाठी लोकांची गर्दी प्रचंड प्रमाणात जमू लागली आहे.

सर्वसामान्यांसोबत या सर्व प्रकारात कलाकार मंडळी सुद्धा येतात. आपल्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हे कलाकार नेहमीच उत्सुक असतात. काहींना कामानिमित्त लांब राहावे लागते त्यामुळे या सणाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा कुटुंबासोबत वेळ घालवता येतो. हवी तशी शॉपिंग करता येते. सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांच्या दिवाळीच्या शॉपिंगचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

मराठीतील नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलणारी अभिनेत्री हेमांगी कवीने सुद्धा नुकतीच तिची दिवाळीची शॉपिंग पूर्ण केली. तिने तिच्या सोशल मीडियावर कंदील खरेदी करतानाचा एक व्हिडिओ आणि त्या मागच्या आठवण शेअर केली आहे. तिने लिहिले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही!मला आठवतंय दुकानात, बाजारात जाऊन ‘कंदील’ निवडायची जबाबदारी मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पासून देण्यात आली किंवा मी ती स्वतः घेतली कारण रंगांचं ज्ञान इतरांपेक्षा टीचभर जरा बरं म्हणून. पण मग तेव्हापासून ही रीतच झाली दरवर्षी वेळात वेळ काढून मी कंदील खरेदी करायला जाते म्हणजे जातेच.

खूप भारी वाटतं निरनिरळ्या पद्धतीचे कंदील पाहून! प्रत्येकाला वाटतं सगळ्यांपेक्षा वेगळा आणि हटके कंदील आपल्या दारात, खिडकीत आसावा! खरंतर कंदील इकडून तिकडून सारखेच पण आपण निवडलेला कंदील हा आपल्या पुरता का होईना special च असतो! पण मग इतक्या सर्व options मधून तो ‘एक’ कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या! लय कटीन! म्हणजे मी एखादी साडी पटकन निवडेन पण कंदील निवडणं is altogether different game भाई. कारण ही गोष्ट अशीय ना की ती घरातल्या प्रत्येकाला आवडायला हवी, आपली मनमानी करून चालत नाही! मला वाटलं म्हणून मी आणला असं करून नाही चालत. तर घरातल्या प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा विचार करून आणावा लागतो! निदान मी तरी असं करते! मज्जा असते सगळी!
तुम्ही करता का असं?

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss