Friday, December 1, 2023

Latest Posts

तेजस्विनी पंडीतने दिवाळीतील दीपोत्सवाचे खास फोटो आणि पोस्ट शेअर करत, राज ठाकरेंचे मानले आभार 

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शिवाजी पार्कत जाऊन दिवाळीतील दीपोत्सवाचा आनंद घेतला आहे.यावेळी तेजस्विनीने दिवाळीतील दीपोत्सवाचे खास फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शिवाजी पार्कत जाऊन दिवाळीतील दीपोत्सवाचा आनंद घेतला आहे.यावेळी तेजस्विनीने दिवाळीतील दीपोत्सवाचे खास फोटो शेअर केले आहेत.या फोटोंसह तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार देखील मानले आहेत. शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव साजरा करत तिने राज ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

मुंबईसह देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीनिमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क दिवाळीत आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतं. दरवर्षी मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये आकर्षक रोषणाई केली जाते, दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये सुंदर विद्युत रोषणाई केली गेली आहे. दिवाळीतील हे खास आकर्षण पाहण्यासाठी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अनेकांनी शिवाजी पार्कमध्ये गर्दी केली होती. यात मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. मनसेकडून आयोजित केलेल्या दीपोत्सवात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडीतदेखील शिवाजी पार्कमधील दीपोत्सवात सहभागी झाली होती. तिने राज ठाकरेंचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे बाल्कनीत उभे असल्याचं दिसतंय. समोर फटाक्यांची आतिषबाजी आणि खाली दिव्यांचा झगमगाट दिसतो आहे. तेजस्विनीने राज ठाकरेंचा पाठमोरा फोटो स्टोरीमध्ये शेअर करत, ह्या अनुभनासाठी खूप खूप धन्यवाद साहेब असं लिहिलंय. दीपोत्सव २०२३, राज साहेब ठाकरे असे हॅशटॅग वापरत तिने ‘हे सगळं तुम्हीच करू जाणे…’ असंही लिहिलं.

तेजस्विनीने शिवाजी पार्कमध्ये केलेली आकर्षक रोषणाई, तसंच अशा प्रकारच्या सुंदर दीपोत्सवाच्या अनुभवासाठी राज ठाकरेंचे धन्यवाद मानले आहेत. दरम्यान, मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव साजरा करण्याचं यंदाचं ११वं वर्ष आहे. १० नोव्हेंबर रोजी मनसेने फटाक्यांची आतिषबाजी करत दीपोत्सव साजरा केला होता. दरवर्षी शिवाजी पार्क दिव्यांनी उजळून जातो. दरवर्षी विविध रंगी सजावट इथे केली जाते. यंदाही शिवाजी पार्कमध्ये सुंदर रोषणाई करण्यात आली असून अनेकांनी याचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.पार्कात फक्त सर्वसामान्य जनतेनेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावत या दिपोत्सवाचा आनंद घेतला आहे.

हे ही वाचा : 

 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना धमकी

यंदाच्या दिवाळीत तुम्ही कुटुंबापासून दूर आहात? एकटेपणावर मात करण्यासाठी करा ‘या’ पद्धतींचा अवलंब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss