Saturday, December 2, 2023

Latest Posts

 नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा ‘फ्रेम’, पत्रकारांच्या जगण्यावर भाष्य करणारा सिनेमा

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांची ओळख आहे.दिग्दर्शनासोबतच त्यांनी अभिनयात देखील आपला जम बसवला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांची ओळख आहे.दिग्दर्शनासोबतच त्यांनी अभिनयात देखील आपला जम बसवला आहे.नागराज मंजुळेंचा प्रत्येक सिनेमा पाहणं एक पर्वणी असते. फँड्री, सैराट अशा सिनेमांमधून नागराजने उत्कृष्ट काम केलंय.त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी खास संदेश तर असतोच.

नागराजचे सिनेमे पाहणं एक पर्वणी असते. नागराज प्रत्येक सिनेमांमधून मनोरंजन करण्यासोबतच सामाजिक विषय मांडताना दिसतो. अशातच नागराजच्या आगामी सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दरम्यान या सिनेमाचं नाव ‘फ्रेम’ असं आहे.

नागराज मंजुळेचा आगामी सिनेमाची घोषणा झालीय. फ्रेम असं या सिनेमाचे नाव आहे, फ्रेमचा टीझर नाळ 2 सोबत दाखवण्यात येतोय. फ्रेमच्या टीझरमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की एका बुलेटवर Press असं लिहीलं असतं. या बुलेटमधून नागराज मंजुळे उतरतात. त्यांच्यासमोर लोकांची गर्दी वेगाने पळत असते. नागराज त्या गर्दीचे त्यांच्या कॅमेरात फोटो काढतात. नागराज मंजुळेंच्या आगामी फ्रेम सिनेमाचं दिग्दर्शन विक्रम पटवर्धन यांनी केलं आहे, या सिनेमात स्वतः नागराज मंजुळे प्रमुख भुमिकेत आहेत. ते या सिनेमात फोटोजर्नलिस्टची भुमिका साकारताना दिसणार आहेत.त्यामुळे प्रेक्षक वर्ग ही नागराज यांना फोटोजर्नलिस्ट या भुमिकेत पाहण्यासाठी उत्साही आहेत.

याशिवाय या सिनेमात नागराज मंजुळेंसोबत मराठी विश्वातील आघाडीचा अभिनेता अमेय वाघ झळकणार आहे.अमेय वाघची झलकही टीझरमध्ये पाहायला मिळते.हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला भेटीला येणार आहे. सिनेमाच्या टीझरवरुन हा सिनेमा पत्रकारांच्या आयुष्यावर भाष्य करणार अशी शक्यता आहे.दरम्यान आजपर्यत नागराज यांना आपण चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना पाहिली आहे.तर आता नागराज यांना मुख्य भुमिका साकारताना पाहण्यासाठी प्रेक्षक ही आतुर आहेत. नागराज मंजुळे यांनी शाळा,फॅन्ड्री,सैराट यासारखे सुपरहिट चित्रपट मराठी प्रेक्षकांना दिले,नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक सिनेमाला चांगला प्रतिसाद देत असतात.दरम्यान प्रेक्षक त्यांच्या आगामी सिनेमाची नेहमीच वाट बघत असतात.दरम्यान सोशल मीडियावर नागराज मंजुळे यांचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.

हे ही वाचा : 

एका माशानं रातोरात बनवलं करोडपती

IND vs NED, नेदरलँड्स विरुद्ध या ३ खेळाडूंना मिळू शकते विश्रांती…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss