Monday, November 20, 2023

Latest Posts

रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र लूक बघायला मिळाले.रणबीरचा हा हटके लूकला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटासाठी गेले बरेच दिवस रणबीरचे चाहते उस्तुक असल्याचे समझत आहे.नुकतीच मिळालेल्या बातमीनुसार ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला परदेशात सुरुवात झाली आहे. यूएसएमध्ये १७२ ठिकाणी या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. आत्तापर्यंत परदेशात या चित्रपटाच्या ११०० हून अधिक तिकिटांची विक्री झाली असून यातून या चित्रपटाने १६ लाख रुपयांचा व्यवसाय प्रदर्शनाच्या आधीच केला आहे.

टीझरपासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची वाट बघत होते. मध्यंतरी हा ट्रेलर रणबीरच्या वाढदिवशी येणार अशी चर्चा होती, परंतु ते शक्य झालं नाही आणि पुढे दिवाळी असल्याने ट्रेलर प्रदर्शन लांबणीवर पडलं. आता मात्र प्रेक्षकांना फार वाट पहावी लागणार नाही कारण ‘अ‍ॅनिमल’च्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. रणबीर कपूर व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर हा २३ नोव्हेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. बरेच दिवस प्रेक्षक या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर व रश्मिकासह,अनिल कपूर बॉबी देओल, शक्ति कपूर, प्रेम चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा सर्वात हिंस्त्र चित्रपट असणार आहे हे संदीप रेड्डी वांगा यांनीच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. १ डिसेंबरला ‘अ‍ॅनिमल’च्या बरोबरच विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’सुद्धा प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.या दोन्ही तगड्या स्टार कास्टचा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यांने आता बॉक्स ऑफिसवर कोणाचा चित्ररट आपला जम बसवणार हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

BJP चे बावनकुळे Casino मध्ये, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर राजकारण रसातळाला

BJP चे बावनकुळे Casino मध्ये, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदानंतर राजकारण रसातळाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss