Friday, December 1, 2023

Latest Posts

‘टायगर ३’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई,तब्बल इतके कोटी

बॉलीवूड अभिनेता सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित करण्यात आला.

बॉलीवूड अभिनेता सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित करण्यात आला.प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या स्पाय चित्रपटाच्या या तिसऱ्या भागाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याचे आकडे समोर आले आहेत.

‘टायगर ३’ ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात बॅटिंग केली आहे. पहिल्या दिवसाची आकडेवारी बघता अखेर सलमानचा चित्रपट बघायला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपटगृहात गेल्याच दिसून आलं आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार टायगर ३ ने पहिल्या दिवशी ४० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने तब्बल ४४.५० कोटी कमावले आहेत. चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ४४.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपट दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी जवळपास २५ कोटींची कमाई करू शकतो. खरं तर हे पहिल्या दिवसाच्या तुलनेने कमी असेल, पण चित्रपट रविवारी प्रदर्शित झाल्याने सोमवारपासून आठवडा सुरु होतो, तसेच आज कोणतीही सुट्टी नाही, त्यामुळे एकूण कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाची कमाई आणि दुसऱ्या दिवसाचे अंदाज पाहता चित्रपट तीन दिवसात १०० कोटींचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान टायगर-3 हा चित्रपट प्रदर्शित होताच सलमानच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला. सलमानचे चाहते फटाक्यांची आतषबाजी करत थिएटरबाहेर जल्लोष करताना दिसून आले.सोशल मीडियावर  जबलपूर, भुवनेश्वर आणि  विविध ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, ‘टायगर ३’ या चित्रपटात सलमान खान टायगरच्या भूमिकेत तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच चित्रपटांमध्ये आपल्या रोमँटिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला इमरान हाश्मीने खलनायकाची भूमिका केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याला नव्या रुपात पाहता येणार आहे. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर ‘टायगर ३’ येत्या काळात बॉक्स ऑफिसवर कितीचा गल्ला जमवणार हे पाहणं आता औस्तुकत्तेच ठरणार आहे.

हे ही वाचा : 

छत्रपती संभाजीनगर शहरात फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना

जिनिलीयाने दोन्ही मुलांना उटणं लावून घातलं अभ्यंगस्नान, व्हिडीओ व्हायरल  

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss