Sunday, December 3, 2023

Latest Posts

हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ मध्ये दिसणार आलिया भट्ट तर मुख्य भुमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री!

 बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी ‘वॉर 2’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सध्या हृतिक वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हृतिकच्या या चित्रपटात साउथ स्टार ज्युनियर एनटीआरची एंट्री झाल्यानंतर या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे

 बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी ‘वॉर 2’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान आता अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षीत सिनेमा टायगर 3 प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आता हा सिनेमा रिलिज झाला असून या चित्रपटात शाहरुख खानच्या कॅमिओसोबत हृतिक रोशनचा देखील कॅमिओ पाहायला मिळणार आहे.हा कॅमिओ पाहिल्यानंतर चाहते उत्सुक झाले आहेत. हृतिक त्याच्या ‘वॉर 2’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. टायगर 3 मध्ये त्याने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.

सध्या हृतिक वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हृतिकच्या या चित्रपटात साउथ स्टार ज्युनियर एनटीआरची एंट्री झाल्यानंतर या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भुमिका साकारणार याबाबत माहीती समोर आली नव्हती . यासाठी कियारा आणि क्रितीच्या नावाची वर्णी लावण्यात आली होती. आता त्यातच या चित्रपटात दोन लेडी स्टार्स अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

,वॉर 2′ या चित्रपटात कोणती बॉलिवूड अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे याबाबत चर्चा सुरु झाली आहे. ‘वॉर 2’मध्ये दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिकासोबत आलिया भट्ट देखील दिसणार आहे. आलिया या चित्रपटात मुख्य भुमिकेत नाही तर चित्रपटात तिचा कॅमिओ असणार आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी दोन्ही अभिनेत्रींना अप्रोच केल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत दीपिका पदुकोण किंवा आलिया भट्टने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दीपिका सध्या हृतिकसोबत फायटर चित्रपटात काम करत आहे. तर ज्युनियर एनटीआर त्याच्या ‘देवारा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील आहेत.

दरम्यान आता आलिया या चित्रपटात आपली झलक दाखवणार तर आहेच,मात्र आता हृतिक रोशन सोबत मुख्य भुमिकेत कोणती अभिनेत्री दिसून येणार हे पाहणं औस्तुकत्तेच ठरणार आहे.

हे ही वाचा : 

यंदा भाऊबीजच्या निमित्ताने बहिणीसाठी खास फायनान्शिअल गिफ्ट द्या

‘टायगर ३’ प्रदर्शित होताच चाहत्यांनी फटक्यांची आतषबाजी करत थिएटरबाहेर केला जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss