‘हे’ मराठी कलाकार पोहचले नरेंद्र मोदी स्टेडियमवर,तर काहींनी टीम इंडियाला केला सपोर्ट
भारत आणि ऑस्ट्रलिया या सामन्याकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. अशातच आता मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्याकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. अशातच आता मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. काही मराठी कलाकार हे टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत.
मृण्मयी आणि अदिती पोहोचल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मृण्मयी देशपांडे आणि अदिती द्रविड या दोघी नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी पोहोचल्या आहेत. दोघींनी सोशल मीडियावर नरेंद्र मोदी स्टेडियममधील फोटो शेअर केले आहेत.
सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धूनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं टीम इंडियाची जर्सी घातलेली दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “Comonnn team india…. ले्हारा दो.”अभिनेत्री मिथिला पालकरनं देखील सोशल मीडियावर तिचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, “गाण्यासह सर्व काही थ्रोबॅक आहे. पण भावना एकच आहे – INDIAAAAA… INDIA” मिथिला पालकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिवाळी साजरी करण्यासाठी दुबईत गेली आहे.दरम्यान ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते,दरम्यान सोनालीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे,ज्यात ती आणि तिचं कुटुंब दुबईतून टीम इंडियाला शुभेच्छा देत आहे,पती सह ती हा सामन्याचा आनंद घेताना दिसून येत आहे,फोटोमध्ये या दोघांनीही टीम इंडियाची जर्सी घातलेलं दिसून येत आहे,सोनालीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे.