Saturday, April 20, 2024

Latest Posts

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

हिंदी एंटरटेनमेंट म्हटलं की सलमानचा बिग बॉस (Bigg Boss) हा शो हमखास आलाच. प्रेक्षकांना या शोची अत्यतं उत्सुकता असते. तसेच प्रेक्षक प्रत्येक सीजनची आतुरतेने वाट पाहत असतात.

हिंदी एंटरटेनमेंट म्हटलं की सलमानचा बिग बॉस (Bigg Boss) हा शो हमखास आलाच. प्रेक्षकांना या शोची अत्यतं उत्सुकता असते. तसेच प्रेक्षक प्रत्येक सीजनची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वर्षापासून बिग बॉस हे ओटीटीवर देखील सुरु करण्यात आले. गेल्या वर्षीचा ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) हा शो प्रेक्षकांमध्ये प्रचंड हिट ठरला, तसेच ओटीटीच्या पहिल्याच सीजनमध्ये चाहत्यांमध्ये हिट ठरलेली, दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिने प्रथम प्राईझ पटकावले. बिग बॉस ओटीटीच्या सीझन २ (Bigg Boss OTT 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

बिगबॉस ओटीटी २ ची प्रेक्षक अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा शो जून महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे म्हंटले जात आहे. बिगबॉस ओटीटी २ मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. बिग बॉस ओटीटी २ मध्ये एका गायकाची एंट्री होणार असल्याची तुफान चर्चा सध्या सोशल मीडिया वर होत आहे.

प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) हा बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वामध्ये सहभागी होणार असल्याचे म्हंटले जात आहे. अभिजीत हा इंडियन आयडॉल (Indian Idol) या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा विजेता आहे. अभिजित सावंत बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार, अशी तुफान चर्चा सोशल मीडियावर होत आहे. याबाबत या संबंधित अभिजितने कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली होती. आता या सीझनच्या दुसऱ्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होतील? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन करण जोहर यानं केलं होतं. तर ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ चे होस्टिंग सलमान खान करणार आहे.

हे ही वाचा:

IPL2023 सारखाच राहणार का Ajinkya Rahaneचा पवित्रा?

एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार?, Gopichand Padalkar यांनी दिली माहिती

World Test Championship च्या आधीच ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू David Warner ने घेतली निवृत्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss