Friday, April 19, 2024

Latest Posts

२ जूनला उडणार ‘फकाट’च्या ‘एलओसी सिक्रेट’चा धमाका

धमाकेदार गाणी आणि भन्नाट टिझर प्रदर्शित झाल्यानंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपट आता २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धमाकेदार गाणी आणि भन्नाट टिझर प्रदर्शित झाल्यानंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपट आता २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून हे पोस्टर चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढवणारे आहे.

पोस्टरमध्ये हेमंत ढोमेच्या हातात एक ‘एलओसी सिक्रेट’ची फाईल दिसत असून सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, महेश जाधव, किरण गायकवाड ही फाईल मिळवण्यासाठी खेचाखेची सुरु आहे. अनुजा साठे आणि रसिका सुनील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र कबीर दुहान सिंग त्या सगळ्यांच्या मागे उभा दिसत असून त्याच्या हातात दोन बंदुका दिसत आहेत. त्यामुळे आता हे ‘एलओसी सिक्रेट’ प्रकरण नेमके काय आहे, याचे सिक्रेट २ जूनलाच उघड होणार आहे. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मात्या नीता जाधव आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ” चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आम्ही बदलली असून २ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक धमाल विनोदी, कौटुंबिक चित्रपट असून तो प्रेक्षकांनी पाहावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. चित्रपटातील कलाकारही एकदम ‘ ‘फकाट’ आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटगृहातून बाहेर पडताना पैसा वसूल धमाल कॅामेडी, अॅक्शन चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच असेल.”

तर ट्रेलरमध्ये भारत -पाक युद्ध, विनोद, प्रेम असे सगळेच पाहायला मिळत आहे. एलओसी सारखा गंभीर विषय असतानाच हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांची धमालही दिसतेय. घरच्यांनी आणि या दोघांनीही आपण काहीच करू शकत नसल्याची आशा सोडल्यानंतर अचानक हेमंत आणि सुयोगच्या हाती एक हायली कॅान्फिडेन्शिअल फाईल लागते आणि त्यानंतर ते त्या फाईलची काय विल्हेवाट लावतात, यादरम्यान त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर जो धिंगाणा होतो तो ‘फकाट’मध्ये पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये अभिजीत खांडकेकर याचीही झलक दिसत आहे. त्यामुळे आता त्याची यात काय भूमिका आहे, हे ‘फकाट’ पाहिल्यावरच कळेल. ‘फकाट’च्या निमित्ताने कबीर दुहान सिंग मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तो नकारात्मक भूमिकेत दिसत असून त्याचा एक वेगळाच दरारा या चित्रपटात दिसत आहे. तसेच वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनिल, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हे ही वाचा : 

‘Unlock Zindagi’तील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला

IPL2023, सुनील गावस्कर झाले कॅप्टन कूलचे फॅन, चेपॉकच्या मैदानात घेतली ऑटोग्राफ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss