Saturday, June 3, 2023

Latest Posts

गौतमीच्या आडनावावरून महासंघाने दिला गौतमीला इशारा

आपल्या नृत्याने संपूर्ण राज्यामध्ये धुमाकूळ घालणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पहिल्यांदाच विरारमध्ये कार्यक्रम पार पडला होता. विरारमध्ये या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती.

आपल्या नृत्याने संपूर्ण राज्यामध्ये धुमाकूळ घालणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील पहिल्यांदाच विरारमध्ये कार्यक्रम पार पडला होता. विरारमध्ये या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. वसई, नालासोपारा आणखी बऱ्याच ठिकाणांवरून प्रेक्षक गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम आवरता आवरता पोलिसांना नाकी नऊ आले होते. यावेळी कार्यक्रमाच्यानंतर गौतमीने मीडियाशी संवाद साधला आहे. तिच्या आडनावाला मराठा महासंघाने विरोध केला आहे.

मराठा महासंघाने तुम्ही पाटील आडनाव वापरले तर तुमचा कार्यक्रम बंद पाडू असा इशारा दिला आहे. माध्यमांनी तिला तिच्या आडनावाच्या बाबतीत विचारले असता. त्यावर तिने तिचे मत व्यक्त केले आहे. यावर गौतमी म्हणाले की, त्यावर मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना… असं गौतमी पाटील म्हणाली. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलतं. मला काही फरक पडत नाही. नो कमेंट्स त्यांनतर ती म्हणाले की, मी कसलीही बदनामी करत नाही मी माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे आणि तो मी सांस्कृतिक रित्या पार पाडण्याचा प्रयत्न करते असे गौतमी पाटीलने सांगितले.

पुढे गौतमी म्हणाली की, चांगला कार्यक्रम होत असतो. कोण मला नावे ठेवतो त्याचा मला काही फरक पडत नाही. कोआला जर माझ्या कार्यक्रमावर आक्षेप असेल किंवा प्रश्न असे तर त्यांनी यावे आणि माझा कार्यक्रम पुन्हा पाहावा आणि मगच बोलावे. असे आव्हान गौतमीने विरोधकांना केले आहे. गौतमी पाटील राजकारणामध्ये येणार असा प्रश्न विचारला असता? यावर गौतमी म्हणाली की, त्यावर तिने थेट उत्तर देत या चर्चाना पूर्णविराम दिला. मी राजकारणामध्ये येणार नाही. असं काही नाही असे ती म्हणाली.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss