spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

पाहुणा घरी येणार गं! ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अस्मिताचा म्हणजेच मोनिका दबडेच डोहाळेजेवण; पाहा फोटो

छोट्या पडद्यावरीन लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ गेल्या २ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अशातच २ महिन्यापूर्वीच या मालिकेतील नकारात्मक भूमिका गाजवणारी अस्मिता म्हणजे अभिनेत्री मोनिका दबडे हिने चाहत्यांना गुड दिलेली होती. मोनिका लवकरच आई होणार असून आता तीच डोहाळेजेवण पार पडलंय.

‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मोनिकाच्या डोहाळेजेवणाला ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सहकलाकारांनी हजेरी लावतं उत्साहाने सहभागी झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
मालिकेच्या सेटवर नुकतंच मोनिका दबडेचं डोहाळेजेवण पार पडलं. त्यामध्ये डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात बोलताना अभिनेत्रीने सहकलाकारांचे आभार मानले. तसेच ती सहकलाकारांच्या प्रेमाने ती भारावून गेल्याचे म्हटले आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेतल्या सगळ्या अभिनेत्रींनी मिळून मोनिकासाठी खास डोहाळेजेवणाचं सरप्राइज प्लॅन केलं होतं.
मोनिकाने डोहाळे जेवणासाठी सुंदर अशी साडी नेसली होती. त्यावेळी फुलांचे दागिने, नाकात नथ, साडीवर ‘आई’ असं नाव लिहलेला बॅच असा सुंदर लुक अभिनेत्रीने डोहाळे जेवणासाठी केला होता.
मोनिका व तिचा पती चिन्मय या दोघांनीही डोहाळजेवणात सुंदर उखाणा घेतला. चिन्मयने म्हटले, “मोनिकाच्या डोहाळजेवणाला कौतुकाने जमली मंडळी सारी, मोनिकाचं नाव घेतो, घास भरवतो श्रीखंड आणि पुरी.” तर मोनिकाने, “चिन्मयरावांच्या हातची खाल्ली श्रीखंड पुरी, अशीच आयुष्यभर साथ दे, ठेवू नको दुरी”, असा उखाणा घेतला.

Latest Posts

Don't Miss