Wednesday, April 24, 2024

Latest Posts

हॉलिवूड Leonardo Dicaprio आणि Neelam Gill दोघांच्या डेटच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या

हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio) तो एक भारताच्या मॉडेलला देत करत आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. लियोनार्डो डिकॅप्रियो हा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio) तो एक भारताच्या मॉडेलला देत करत आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. लियोनार्डो डिकॅप्रियो हा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या मॉडेलचे नाव आहे नीलम गिल (Neelam Gill). सोशल मीडियावर हे दोघे डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. लियोनार्डो डिकॅप्रियो यांचे वय ४८ वर्ष आहे तर नीलम गिलचे वय २८ वर्ष आहे. या दोघांना लंडनमधील चिल्टन फायरहाऊसमध्ये स्पॉट करण्यात आले. या फार्म हाऊस मध्ये सोबत नीलम गिलची आई देखील सोबत होती. त्याचबरोबर लियानोर्डो आणि नीलम गिल हे दोघे कान्स फेस्टिव्हल २०२३ मध्ये एकत्र दिसले होते. त्यामध्ये आणखी चर्चाना उधाण आले आहे.

नीलम गिल ही एक पंजाबी मॉडेल आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते आणि तिचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नीलम फील नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते. नीलमचा जन्म २७ एप्रिल १९९५ रोजी लंडनमध्ये झाला आहे. २०१४ पर्यत ती लंडनमध्ये होती. नीलम तिच्या युट्यूब चॅनेलवर देखील सक्रिय असते. ती युट्यूब चॅनेलवर नैराश्य, सकारात्मकता अशा वेगवेगळ्या विषयांवर ती भाष्य करत असते. नीलमने तिच्या करियरची सुरुवात लंडन फॅशन वीकच्या माध्यमातून केली आहे.

लियोनार्डो डिकॅप्रियो आणि मोरोन हे दोघे चार वर्ष डेट करत होते परंतु त्यांचे नाते फार वेळ काही टिकले नाही. त्यानंतर त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लियोनार्डो डिकॅप्रियो हे गिगी हदीदला डेट करत होते त्यानंतर त्याने १९ वर्षीय मॉडेल एडेन पोलानीला डेट करत होता. लियोनार्डो डिकॅप्रियो हा आज जागतिक स्तरावर एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. टायटॅनिक चित्रपटामुळे लियोनार्डो डिकॅप्रियो याला जगभरामध्ये प्रसिद्ध मिळाली.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss