Raja Shivaji Film : महाराष्ट्राचा ‘लाडका भाऊ’ अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) हा मराठी इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपट देत आहे. आता लवकरच पुन्हा एकदा ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटत रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही रितेश देशमुखने सांभाळली आहे. त्यानंतर आता रितेश छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणार आहे. या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि फरदीन खान (Fardeen Khan)मुघलांची भूमिका साकारणार आहेत.अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणूण त्याचा हा दुसरा मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’ घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे रितेशने या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना साइन केलं आहे.
रितेश देशमुख या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, अभिषेक, फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे. तर माध्यमांच्या रिपोर्टनुसार, अभिषेक आणि फरदीन मुघलांच्या भूमिकेत दिसतील तर रितेश पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसेल. राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. रितेशने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, ‘इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज… हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही ३५० वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे… प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ त्या अनुषंगाने ह्या वर्षीच्या शिवजयंतीला कोणती नवीन घोषणा होते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रितेश देशमुखने बालक पालक या चित्रपटाचा निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर लय भारी या ऍक्शन चित्रपटातून मराठी अभिनयात पदार्पण केले. ‘वेड’ (Ved) चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुखने नवी ओळख केली.आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचा सुपरहिट मराठी चित्रपट ‘वेड’ प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटाला ओटीटीवरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. या चित्रपटाची निर्माती रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखने केली होती. अवघ्या १५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘वेड’ हा २०१९ च्या हिट तेलुगू चित्रपट ‘माजिली’ चा मराठी रिमेक आहे. ‘माजिली’मध्ये समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य मुख्य भूमिकेत आहेत.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा