Saturday, June 3, 2023

Latest Posts

गोरी नागोरीच्या मेहुण्यानेच केली तिला मारहाण

आपल्या सोशलमिडीयावर अनेक व्हिडीओ गंमतीजंमतीचे त्याचबरोबर अनेक मारहाणीच्या घटना समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

आपल्या सोशलमिडीयावर अनेक व्हिडीओ गंमतीजंमतीचे त्याचबरोबर अनेक मारहाणीच्या घटना समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. बिग बॉस १६ Big Boss 16) मध्ये आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकणारी हरियाणवी डान्सर गोरी नागोरी Dancer Gori Nagori) हिला नुकतीच मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

गोरीच्या बहिणीचे लग्न होते त्यासाठी ती तिच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी अजमेरला गेली होती. परंतु त्या लग्नामध्ये नागोरीचे मेहुणे जावेद हुसेनसोबत Javed Hussain) तिचे भांडण झाले. परिस्थिती इतकी बिघडली त्या लग्नात गोरी नागोरीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर गोरी नागोरी ही पोलिसात तक्रार करण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिला मदत करण्यास नकार दिला.

उलट तिच्यासोबत सेल्फी काढून तिला घरी पाठवले. पोलिसांनी गोरी नागोरीला मदत न दिल्यामुळे गौरीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्याकडे धाव घेतली आणि दाद मागितली आणि तिने पोलिस कोणताही गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोपही केला आहे. त्यांनतर असे समोर आले आहे की, हे प्रकरण मुद्दाम जाणून करण्यात आले आहे. या सर्व घटनेची आधीपासूनच गोरी नागोरीचा मेहुणा जावेद हुसेन याचं प्लॅनिंग करत होता.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss