spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

'द केरला स्टोरी' ('The Kerala Story') या चिटपाटला रिलीज होऊन जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान आणि रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.

‘द केरला स्टोरी’ (‘The Kerala Story’) या चिटपाटला रिलीज होऊन जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान आणि रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. परंतु या चित्रपटानंतर कोणताही सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर टक्कर देऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात सुप्रसिद्ध स्टार्समध्ये, नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) चा ‘जोगिरा सारा रा रा’ आणि विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) चा ‘IB71’ हे चित्रपट गेल्या ४ आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस आले परंतु हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर फेल झाले. त्यामुळेच शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या विकी कौशल आणि सारा अली खानच्या ‘जरा हटके जरा बचके’ (‘Zara Hatke Jara Bache’) या चित्रपटावर प्रत्येकाचेच डोळे होते.

‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाचा ट्रेलर हा अतिशय दमदार होता. परंतु ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद सांगत होता की चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतेही विशेष वातावरण तयार केले जात नाही. परंतु चित्रपटातील ‘जरा हटके जरा बचके’ या पहिल्या गाण्यामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले. तसेच अरिजित सिंगचे ‘फिर और क्या चाहिये’ हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड पसंतीस पडले. परंतु ट्रेलरवरून हा चित्रपट चांगली कमाई करेल या वर प्रत्येकालाच शंका होती. परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपाटाने प्रचंड कमाई केली आहे, असे बॉक्स ऑफिस च्या कलेक्शन रिपोर्ट्समुळे माहिती समोर आले आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या चित्रपटाच्या ओपनिंग कलेक्शनने इंडस्ट्रीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.

शुक्रवारच्या कलेक्शन रिपोर्टनुसार विकी आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाने कमाईत सकाळी संथ सुरुवात केली. परंतु दुपारनंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड पाठींबा मिळाला. पहिल्या दिवशी हा सिनेमा ३ कोटींची कमाई करेल अशी सर्वांची अपेक्षा होती. तसेच प्रेक्षकांच्या अति कौतुकामुळे हा आकडा ४ कोटींपर्यंत पोहोचू शकतो असे देखील वर्तवण्यात आले होते. परंतु या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहून सर्वांनीच आपल्या भुवया उंचावल्या आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५.४९ कोटींची कमाई केली आहे. ‘जरा हटके जरा बचके’चे रिपोर्टेड बजेट ४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार हा चित्रपट २००० पेक्षा कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. अशा स्थितीत ५.४९ कोटी रुपयांची सुरुवात भक्कम आहे. विकी आणि साराचा हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये आरामात २० कोटी रुपये कमवू शकतो.

हे ही वाचा:

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

राजकारणात रंगलेल्या चर्चांवर Pankaja Munde स्पष्टचं बोलल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss