Friday, March 29, 2024

Latest Posts

कंगनाची आरोपांवर जावेद अख्तर यांनी दिले स्पष्टीकरण

जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली होती. २०२० मध्ये कंगनाने एक मुखामध्ये जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते. कंगनाने असे आरोप केले होते की, गीतकार जावेद अख्तर यांनी धमकी दिली होती.

जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली होती. २०२० मध्ये कंगनाने एक मुखामध्ये जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते. कंगनाने असे आरोप केले होते की, गीतकार जावेद अख्तर यांनी धमकी दिली होती. परंतु जावेदने या प्रकरणाला फारसे महत्व न देता प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. परंतु कोरोनाच्या काळामध्ये बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या आरोपांकडे लक्ष वेधले आणि अभिनेत्रींच्या विरोधामध्ये थेट कोर्टाची पायरी गाठली होती.

कंगनाच्या विरोधामध्ये ठोस पावले उचलून जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कांगाच्या विरोधामध्ये कोर्टाच्या मानहानीचा अर्ज दाखल केला. यावर प्रकरणावर ३ मे रोजी सुनावली झाली. मानहानीचा खटल्यात जावेद अख्तर यांनी कोर्टासमोर आपली बाजी मांडली आणि सांगितले की, “मी अशा ठिकाणाहून आलो आहे जिथे कोणी ‘तू’ म्हणत नाही. मी लखनऊचा आहे आणि तिथे कोणीही ‘तू’ म्हणत नाही, उलट ‘अहो जाहो’ म्हणायला शिकवले जाते. जे कोणी माझ्यापेक्षा ३०-४० वर्षांनी लहान असले तरी मी त्याला तुम्ही म्हणून संबोधतो. मी माझ्या वकिलाशी सुद्धा कधी अरे तुरे करून बोललो नाही. माझ्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. खूप धक्का बसला आहे.” अशी बाजू जावेद अख्तर यांनी व्यक्त केली.

कंगनाने २०२० साली एका मुलाखतीमध्ये माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले होते परंतु त्यावर मी कोणाहीती प्रतिक्रिया दिली नाही. परंतु जेव्हा सुशांतचे निधन झाले तेव्हा या प्रकाणावरून गदारोळ सुरु असतानाच मीच त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असे तिने सांगितले. हे माझ्यासाठी खुप अपमानास्पद होते.
असे जावेद अख्तर म्हणाले. पुढे जावेद अख्तर म्हणाले की, सुशांतच्या मृत्यूनंत हा शब्द चर्चेत आला. कंगना हे अनेक मुलाखतींमध्ये बोलली आहे की मी एका सुसाइड ग्रुपचा सदस्य आहे आणि त्याच प्रकारे मी लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहे. पण हे अजिबात खरे नाही. जावेद अख्तर यांनी बाजू मांडल्यानंतर पुढील सुनावणीसाठी कंगना रणौतच्या वकिलाने जावेद अख्तर यांना उलटतपासणीसाठी १२ जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पवारांच्या राजीनाम्याबाबत ठाकरे गटाने केला मोठा दावा

बंगालच्या उपसागरावर ‘Mocha’ चक्रीवादळाचं संकट, जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss