Tuesday, April 23, 2024

Latest Posts

अर्पिता खानच्या घरामधील दागिने चोरीला, कोण आहे हा चोर?

सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खानच्या (Arpita Khan) घरामधून लाखो रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती.

सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खानच्या (Arpita Khan) घरामधून लाखो रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती. मुंबईमधील खार पोलीस ठाण्यामध्ये तपासानंतर पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव संदीप हेगडे आहे, हा आरोपी विलेपार्ले पूर्व येथील आंबेवाडी झोपडपट्टीत राहणारा आहे. खारमधील अर्पिता खानच्या उच्चभ्रू घरामध्ये हा संदीप हाऊसकीपर म्हणून काम करायचा. अर्पिता खान तिच्या पोलीस तक्रारीमध्ये सांगितले आहे की, तिचे पाच लाख किमतीचे हिऱ्याचे झुमके मेकअप ट्रेमध्ये ठेवले होते आणि ते बेपत्ता झाले होते. ही घटना १६ मे रोजी घडली आहे आणि त्याच रात्री आरोपीला अटक करण्यात आली.

खारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन माने यांच्या नेतृत्वाखाली पीआय विनोद गावकर, पीएसआय लक्ष्मण काकडे, पीएसआय गवळी आणि तपास कर्मचार्‍यांचे पथक आरोपीना पकडण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी काम करणाऱ्या हाऊसकिपींग कर्मचाऱ्याच्या ताब्यातून दागिने जप्त केले आहेत. मागील चार महिन्यापासून हा आरोपी ११ जणांसह आरोपी संदीप हेगडे हा अर्पिताच्या फ्लॅटमध्ये काम करत होता. चोरी केल्याच्या नंतर तो कोणालाही न सांगता फरार झाला. त्याच्या घरामधून चोरीच्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या. आता पोलीस काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss