Friday, March 29, 2024

Latest Posts

१९ मेपासून ‘कानभट’ ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर

प्लॅनेट मराठीचा 'कानभट' चित्रपट येत्या १९ मे रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. रश प्रॉडक्शन प्रा. लि. निर्मित या चित्रपटाच्या निर्माती अपर्णा एस होशिंग असून त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

प्लॅनेट मराठीचा ‘कानभट’ चित्रपट येत्या १९ मे रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. रश प्रॉडक्शन प्रा. लि. निर्मित या चित्रपटाच्या निर्माती अपर्णा एस होशिंग असून त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. मुळात भारतीय संस्कृतीत जे वेद, पुराण आहेत. ते सगळ्याच शास्त्रांना सामावून घेणारे आहे. खूप वर्षांपासून शास्त्राविषयी लिखाण करणयात आलेले असून ते आता विज्ञानाच्या दृष्टीकोनातून मांडण्यात आले आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न ‘कानभट’मधून करण्यात आला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल झळकले असून यात एक विद्यार्थी आणि त्याच्या बाजूला त्याचे दोन गुरु दिसत आहेत. वेदविद्या शिकतानाचा लहान मुलाचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. ‘कानभट’ची कथा आणि पटकथा अपर्णा एस होशिंग आणि विवेक बोऱ्हाडे यांची असून ‘कानभट’मध्ये भव्या शिंदे, ऋग्वेद मुळे, संजीव तांडेल, विपीन बोराटे, मनीषा जोशी, अनिल छत्रे आणि विजय विठ्ठल वीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्रत्येकाच्या आयुष्यात योग्य दिशा देणारा गुरु असणे खूप गरजेचे आहे. आपली पुरातन संस्कृती, शिक्षण पद्धती यांची ओळख या चित्रपटाच्या निमित्ताने लहान मुलांना, मोठ्यांना होईल. आज जरी आपण सायन्सचा आधार घेत असलो तरी सायन्सची निर्मितीही खूप पुरातन काळापासूनच झाली आहे. हेच या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाल्याने आणि पालकांनी सोबत पाहावा असा ‘कानभट’ आहे.

हा चित्रपट पाल्यांनी आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा, असा आहे. हा चित्रपट जुन्या काळातील शिक्षण पद्धती, रीती, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात किती महत्वाच्या आहेत, याचे पैलू ‘कानभट’ मधून उलगडणार आहेत. खूप सुंदर आणि साधी अशी ही कथा असून आयुष्याला कलाटणी देणारा हा चित्रपट आहे.”

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss