Sunday, April 21, 2024

Latest Posts

कंगना रनौत पोहोचली केदारनाथ मंदिरामध्ये

बॉलीवूडचे कलाकार आता चित्रपटांमध्ये कमी आणि केदारनाथ (Kedarnath) मंदिरामध्ये जास्त दिसायला लागले आहेत. अभिनेत्री सारा अली खान Sara Ali Khan) मागील आठवड्यात केदारनाथला पोहोचली होती.

बॉलीवूडचे कलाकार आता चित्रपटांमध्ये कमी आणि केदारनाथ (Kedarnath) मंदिरामध्ये जास्त दिसायला लागले आहेत. अभिनेत्री सारा अली खान Sara Ali Khan) मागील आठवड्यात केदारनाथला पोहोचली होती. तर अक्षय कुमार Akshay Kumar) मंगळवारी तेथे पोहोचला होता तर कंगना रनौत (Kangana Ranaut) आज केदारनाथ मंदिरामध्ये पाहायला मिळाली. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आज बाबा केदारनाथ मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले. कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि तिच्या चाहत्यांना तिने माहिती दिली आहे. कंगनाने केदारनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले आणि हर हर महादेवाचा जयघोष देखील केला.

कंगनाने शेयर केलेल्या सोशल मीडिया फोटोंमध्ये तिने तिच्या कपाळाला पिवळ्या रंगाचे गंध लावले आहे. त्याचबरोबर तिने केदारनाथ मंदिरामध्ये हर हर महादेवाचा जयघोष देखील केला. बाबा केदारनाथांच्या दर्शनाच्या आनंद अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. कंगनाला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची भरपूर गर्दी झाली होती. कंगनासाठी तिथे सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती तरीसुद्धा मंदिरामध्ये कंगना सर्वसामान्य भाविकांसोबत त्याच्या रंगात रंगताना दिसत आहे. कंगनाने विधींवत बाबांची अभिषेक पूजा केली आणि त्यांच्याकडे आर्शीवाद मागितले. केदारनाथला जाण्याच्या कंगना हरिद्वारला गेली होती. तेव्हा ती गंगा आरतीमध्ये तल्लीन झाली होती. सारा अली खानसोबत साऊथ अभिनेत्रीही केदारनाथ धाममध्ये गेली होती.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss