Thursday, March 28, 2024

Latest Posts

Majhi Tujhi Reshimgath मधील परीची आता हिंदी मालिकेत एन्ट्री 

काही दिवसांपूर्वी सर्वांच्या मनात घर करणारी झी मराठी या वाहिनीवरील मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' हिने निरोप घेतला.

काही दिवसांपूर्वी सर्वांच्या मनात घर करणारी झी मराठी या वाहिनीवरील मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हिने निरोप घेतला. पण या मालिकेतील नेहा, यश आणि परी हे अजूनही सर्वांच्या मनात घर करून आहेत. मायराला या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळ आता काय करते? असा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडला होता. परंतु नुकतीच मायराने सोशल मीडियावर तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो हा शेअर केला आहे. ‘नीरजा एक नई पहचान’ (Neerja Ek Nayi Pehchaan) असे तिच्या नव्या मालिकेचे नाव आहे.

परी म्हणून घर घरात पोहचलेल्या परीने आता एक नवी भरारी घेतली आहे. ती लवकरच एका हिंदी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. ‘नीरजा एक नई पहचान’ या मालिकेचा प्रोमो शेअर करत मायराने लिहिलं आहे,”मायराच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. कलर्स वाहिनीने ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. पण या जगात फिरण्याची नीरजाला का बंदी आहे”. मायराच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत तिचं अभिनंदन करत आहे.

 ‘हिंदी कलर्स’ वाहिनीवर मायराची नवी मालिका येत आहे. या मालिकेचा प्रोमो आता समोर आला आहे. ‘नीरजा एक नई पहचान’ असं या मालिकेचं नाव आहे. मायरा या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये असल्याचं दिसून येत आहे. तसेच प्रोमोमध्ये तिचा निरागस आणि हसरा चेहरा लक्ष वेधून घेणारा आहे. “मायराच्या नव्या मालिकेबाबत घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे” असं व्हिडीओ शेअर करताना मायराच्या टीमने म्हटलं आहे. मायराची नवी मालिका ‘नीरजा एक नई पहचान’ प्रेक्षक हिंदी कलर्स वाहिनीवर पाहू शकतात. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची या बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या मालिकेत मायरा वैकुळ आणि ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मायराची नवी मालिका ‘नीरजा एक नई पहचान’ आई-मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. नीरजाच्या आईला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण आपली लेक या सर्व गोष्टींपासून दूर राहावी यासाठी संघर्ष करणारी ही आई आहे. मायरा आणि स्नेहाची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच मायराच्या या व्हिडीओवर मराठमोळी अभिनेत्री आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मायराच्या आईची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहेरेनेदेखील कमेंट केली आहे. तिने लिहिलं आहे,”माझं बाळ खूप खूप अभिनंदन… मला तुझा खूप अभिमान वाटतो”.

हे ही वाचा : 

मॉडेल सीएना वीरचं वयाच्या २३ व्या वर्षी निधन

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी ७.५ कोटींची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss