Wednesday, April 24, 2024

Latest Posts

मराठमोळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुलाने केले लग्न

प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांनी एक काळ गाजवला आहे. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी त्याच्या अभिनयाची सुरुवात केली होती.

प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांनी एक काळ गाजवला आहे. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी त्याच्या अभिनयाची सुरुवात केली होती. पद्मिनी कोल्हापुरे यांनी अनेक चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. त्यामधील प्रेम रोग, गहराई, सत्यम शिवम सुंदरम, जिंदगी, वो ७ दिन, सौतन, इन्साफ का तराजू अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांना या चित्रपटांमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचबरोबर ऋषी कपूर, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती या बॉलिवूडच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले.

पद्मिनी कोल्हापुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पद्मिनी कोल्हापुरे यांचा चिमणी पाखरं हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला आहे. पद्मिनी कोल्हापुरे यांनी निर्माते टूटू शर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे. १४ ऑगस्ट १९८६ ला दोघांनी लग्न केले आहे. त्यांच्या मुलाचे नाव प्रियांक शर्मा आहे. प्रियांकचा जन्म ४ फेब्रुवारी १९९० ला झाला. पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांकने ‘सब कुशल मंगल’ चित्रपटामधून पदार्पण केले आहे. या चित्रपटामध्ये रवी किसनची मुलगी रीवानाने पदार्पण केले.

प्रियांक शर्मा या वर्षात प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. तिने ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. शाजाने ‘ऑलवेज कभी कभी’ आणि ‘हॅपी न्यू इयर’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये असिस्टेंट डारेक्टर म्हणून काम केले आहे. त्याने अतिशय साधेपणाने लग्न केले आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss