spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

‘मारो देव बापू सेवालाल’ Amruta Fadanvis यांचं नवीन गाणं प्रदर्शित

सामाजिक कार्यकर्त्या, बँकर तसेच गायिका म्हणून ज्यांची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस यांचं 'मारो देव बापू सेवालाल' हे नवं मराठी गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचा सर्वत्र कौतुक होत आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Amruta Fadnavis Song : सामाजिक कार्यकर्त्या, बँकर तसेच गायिका म्हणून ज्यांची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस यांचं ‘मारो देव बापू सेवालाल’ हे नवं मराठी गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचा सर्वत्र कौतुक होत आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात आणि त्याच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता अमृत फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर (U-Tube Channel) अमृता फडणवीस यांचं ‘मारो देव बापू सेवालाल’ (Maro Dev Bapu Sevalal Song) प्रदर्शित केलं आहे. या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहेत, तर याचं संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अमृता फडणवीस बंजारा लूकमध्ये दिसत आहेत.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ह्या नेहमीच काहीतरी वेगळं करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे अनेक ग्लॅमरस लुक, मुलीसोबतचे विडिओ, विविध शो मध्ये ते आपलं मत परखडपणे मांडत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पत्नी असण्यापेक्षा त्यांनी स्वतःची ओळख तयार केली आहे. अशातच आता त्यांचं मारो देव बापू सेवालाल हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

हे ही वाचा :

Latest Posts

Don't Miss