Thursday, March 28, 2024

Latest Posts

मॉडेल सीएना वीरचं वयाच्या २३ व्या वर्षी निधन

वयाच्या २३ व्या वर्षी 'मिस युनिव्हर्स २०२२ ((Miss Universe २०२२)मध्ये आपल्या सौंदर्याचा जळवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचं (Sienna Weir) निधन झालं आहे.

वयाच्या २३ व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स २०२२ ((Miss Universe २०२२)मध्ये आपल्या सौंदर्याचा जळवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचं (Sienna Weir) निधन झालं आहे. २ एप्रिलला सिएना ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो मैदानात घोडेस्वारी करत होती. पण ती अचानक घोड्यावरुन खाली पडली. त्यांनतर तिला लगेचच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु यपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. सीएना वीरचे वयाच्या २३ व्या वर्षी तिची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. तिला डॉक्टरांच्या नियंत्रणात ठेवण्यात आले होते.

सीएना वीर ही ‘मिस युनिव्हर्स २०२२’ च्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. सिनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांमध्ये पदवीचे शिक्षण घेतले होते. आता पुढील शिक्षणासाठी ती युनायटेड किंगडम जाण्याच्या विचारात होती. सिएना ही खूप प्रयोगशील होती. ती मॉडेलिंग क्षेत्रामध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असे. सिएनाच्या मृत्यूनंतर तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा फोटोग्राफर क्रिस ड्वायरने शोक व्यक्त करत लिहिलं आहे की, जगामधील सर्वात प्रेमळ व्यक्ती, अल्पावधीतच यश मिळवलसं पण आता सर्वत्र अंधार आहे. आमच्यासाठी तू कायम जिवंत असशील तुझी आम्हाला आठवण येईल. सिएना वीर एक मॉडेल आहे. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तिने उत्तम कामगिरी केली आहे. आपल्या सौंदर्याने तिने चाहत्यांना भूरळ पाडली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉडेल्समध्ये सिएनाची गणना करण्यात येते. जगभरातील अनेक फॅशन शोमध्ये सिएना सहभागी झाली आहे.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss