Friday, March 29, 2024

Latest Posts

करिअरमध्ये आईची भक्कम साथ…, सईने सांगितलं आईसोबतचे नातं

मराठी चित्रपटसृष्टीत सईने अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सईने धमाकेदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपसृष्टीत आबिनेटरीच्या यादीत सई चे नाव हे अव्वल क्रमांकावर आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सईने अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सईने धमाकेदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपसृष्टीत आबिनेटरीच्या यादीत सई चे नाव हे अव्वल क्रमांकावर आहे. सईने मराठी सिनेमांबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतही स्वतःचे नाव कमावले आहे. मराठीतच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही गुणी अभिनेत्री म्हणून सई ओळखली जाते. अभिनयाचा वारसा न मिळत सईने स्वतःच्या मेहनतीवर आपले नाव कमवले आहे. सई आणि तिच्या आईचे नाते अगदी खास आहे. तिच्या आणि तिच्या आईच्या नात्यांमधील गंमतीबद्दल तिने सांगितले आहे. सईला तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीत तिच्या आईची मोलाची साथ मिळाली आहे आणि अजूनही मिळते आहे.

सई ही मराठी सिनेसृष्टीत आघाडीची अभिनेत्री आहे. सई आणि तिच्या आईच्या नात्यात अगदी वेगळ्याच प्रकारचा गोडवा आहे. सई हि तिच्या आईची एकदम लाडकी आहे. अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सईची आई तिला चेयर करायला नेहमीच हजर असते. अनेक फंक्शनला मायलेकी एकत्र दिसतात. सईला तिच्या आईबद्दल प्रचंड आदर आहे. ती तिच्या आई बद्दल नेहमीच सांगत असते. एका मुलाखतीत सईने तिच्या आईबद्दल अनेक गप्पागोष्टी मारल्या आहेत. तर चक्क एका मुलाखतीत तिने आई आणि तिच्या नात्याबद्दल एक खुलासा केला आहे. सध्याच सईने महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत देताना त्या दोघी सहा महिने एकत्र राहतात आणि सहा महिने वेगळ्या राहतात असं सांगितलं.

मुलाखतीत सई म्हणाली, “मी आम्हा दोघीना तलवारीची उपमा देईन. एका मान्यता जशा दोन तलवारी एकत्र राहू शकत नाहीत, तशाच आम्ही दोघी आहोत. आम्ही वर्षातून सहा महिने एकत्र असतो पण त्यानंतर आम्ही दोघी सहा महिने वेगळ्या राहतो. पण या तालवारींनी लढलेल्या लढाया आणि त्यांचा प्रवास हा माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. अनेक लढाया जिंकून आम्ही इथवर पोहोचलो आहोत.”

सईने तिच्या अभिनयाची सुरुवात ही २००८ साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक अँड व्हाईट या हिंदी सिनेमाने केली. त्यानंतर त्याच साली तिचा सनई चोघडे नावाचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच सईचे अतिशय दमदार भूमिका असलेले चित्रपट आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत. ती एका हिंदी सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हे ही वाचा : 

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंचा २५ कोटी उकळण्याचा डाव

जावई अन् लेकीसाठी परिणीतीच्या आईची भावुक पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss