Thursday, April 25, 2024

Latest Posts

या अभिनेत्रीला पाहताच क्षणी मिळाली सिनेमात काम करण्याची संधी …… कोण आहे ती?

प्रामुख्याने हिंदी व मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणारी बॉलिवूडची लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री जरीना वहाब यांनी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा पडद्यावर पदार्पण केले आहे. यांनी हिंदी व मल्याळम नव्हेच तर अनेक भाषांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

प्रामुख्याने हिंदी व मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणारी बॉलिवूडची लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री जरीना वहाब यांनी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा पडद्यावर पदार्पण केले आहे. यांनी हिंदी व मल्याळम नव्हेच तर अनेक भाषांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. अनेक दशकांच्या कारकीर्दीत तजरीना वहाब यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असली तरी त्यांचा प्रवास हा काही सोप्पा नव्हता. ‘चित्तचोर’ आणि ‘गोपीकृष्ण’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी लोकांच्या मनात अभिनेत्री म्हणून स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले. हल्लीच त्यांनी ‘दि कपिल शर्मा’ शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी इश्क इश्क इश्क या त्यांच्या १९७४ साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या सिनेमातील काही आठवणी शेअर केल्या.

इश्क इश्क इश्क या सिनेमाच्या आठवणी शेयर करताना त्यांनी त्या सिनेमात त्यांना कास्ट कसे केले याबाबत सांगितले. कास्टिंगचा किस्सा सांगत असताना त्या म्हणाल्या तेव्हा नुकतेच मी नवी मुंबईत आले होते आणि मला कोणीतरी सांगितलं की देव साहेबांच्या इश्क इश्क इश्क या सिनेमासाठी कास्टिंग करत आहेत. त्यामुळे मला तिथे काम मिळू शकते. ते ऐकताच मी क्षणाचाही विलंब न करता माझे सगळे फोटो घेतले आणि त्यांच्या सेटवर पोहोचली. असे सांगताना त्या पुढे म्हणाल्या कि, ना माझे फोटोस बघितले ना माझी ऑडिशन घेतली.

देवानंदन साहेब फक्त माझ्या जवळून गेले आणि म्हणाले आपण एकत्र काम करत आहोत. मला धक्काच बसला मी माझ्या फॉर्मॅलिटी करून निघून गेले. त्यांनी पुढे सांगितले कि जवळपास आठवड्यभरानंतर त्यांना देव आनंद यांच्या टीममधून कोणीतरी त्यांना भेटायला आले होते. आणि त्यांनी सांगितले कि देव साहेबांना तुम्हाला भेटायचे आहे. हे ऐकताच त्यांना अतिशय आनंद झाला होता असे त्यांनी सांगितले. पुढे सांगताना त्या म्हणाल्या मी माझे फोटो घेऊन देवानंद साहेब यांना भेटायला गेली होती पण देव साहेब यांनी माझे फोटो पहिलेच नाही. ‘तुमचा चेहरा फोटोजेनिक आहे, तो पाहण्यासाठी मला फोटोंची गरज नाही’ अशा शब्दांत त्यांनी ७०-८० च्या दशकातील दिग्दर्शकांची प्रशंसा केली. त्या काळातील दिग्दर्शकांचे कौतुक करत असताना त्या म्हणाल्या त्याकाळातील दिग्दर्शकांचे डोळे हे कॅमेरासारखे होते.

जरीन यांचा नुकताच एक “दशहरा” नावाचा तेलगू भाषिक चरित्रपट मार्च मध्ये प्रदर्शित झाला होता.

हे ही वाचा : 

दहावीच्या सीबीएसई बोर्डचा निकाल घोषित

तुमचे तूप भेसळयुक्त आहे का? या ट्रिकस वापरून तुपाची शुद्धता ओळखा

बॉलीवूडमधील खिलाडीची पत्नी मच्छीवाली? पाहा काय म्हणाली ट्विंकल खन्ना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss