Saturday, April 20, 2024

Latest Posts

Parineeti-Raghav चा रॉयल साखरपुडा, गाणं गात दिले सरप्राईज

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अखेर शनिवारी रात्री नवी दिल्लीत आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चढ्ढा यांच्याशी एंगेजमेंट झाली आहे.

मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी ही समोर येत आहे. आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री परिणीती चोप्रा ही लवकरच आता लग्नबंधनात अडकली जाणार आहे. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा या दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा ही अनेक दिवसांपासून चालू आहे. तसेच चाहत्यांना देखील या बाबत थोडी चाहूल ही लागली होतच. अखेर दिनांक १३ मे २०२३ रोजी परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा हा पार पडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अखेर शनिवारी रात्री नवी दिल्लीत आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चढ्ढा यांच्याशी एंगेजमेंट झाली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक राजकारणी मंडळी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि परिणीतीची बहिण प्रियांका चोप्रानेदेखील बहिणीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. १५० पाहुण्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा पार पडला आहे. तसेच सध्या परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, या जोडप्याच्या एंगेजमेंट सेलिब्रेशनचा एक नवीन व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परिणीती आणि राघव रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

 व्हायरल व्हिडिओमध्ये परिणीती राघवसोबत तिच्या एंगेजमेंटचा आनंद घेताना दिसत आहे. यादरम्यान, अभिनेत्री तिच्या साथीदार म्हणजेच राघवसाठी माही गाणे गाताना दिसली. हे पाहून त्या नेत्यालाही स्वतःला रोखता आले नाही आणि आपल्या लेडीप्रेमावर प्रेमाचा वर्षाव करताना त्याने तिच्या गालावर चुंबन घेतले आणि तिला आपल्या मिठीत घेतले आहे. परिणीती आणि राघवची दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट झाली. या जोडप्याच्या एंगेजमेंटला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि परिणीतीची चुलत बहीण आणि फिल्म स्टार प्रियांका चोप्रा जोनास यांच्यासह सुमारे १५० पाहुणे उपस्थित होते. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघवनेही त्यांचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच या साखरपुड्यात खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक आणि शाही भोजन हे परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचं विशेष आकर्षण होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

 तसेच परिणीती चोप्राने स्वतः सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री राघव चड्ढा यांच्यासोबत रोमॅंटिक अंदाजात दिसत आहे. साखरपुड्यासाठी परिणीती आणि राघव यांनी खास लूक केला होता. परिणीतीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि राघव यांनीदेखील पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. राघव यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,”मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”.

काही महिन्यांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पहिल्यांदा मुंबईत लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले होते. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. दोघेही त्यांच्या समीकरणाबद्दल कधीच बोलले नाहीत, परंतु दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा होत्या. अखेर शनिवारी या जोडप्याने एंगेजमेंट केले.ज्यापर्यंत त्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे, तर वृत्तांवर विश्वास ठेवला तर दोघेही ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लग्नाच्या बंधनात अडकू शकतात.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss