Friday, April 26, 2024

Latest Posts

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक पार पडली परंतु या निकालामध्ये कोण विजयी होणार आणि अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतीक्षा सर्वानाच लागली होती.

पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक पार पडली परंतु या निकालामध्ये कोण विजयी होणार आणि अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतीक्षा सर्वानाच लागली होती. आज अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली आहे आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. या निवडणुकीमध्ये प्रसाद कांबळी यांचे आपलं पॅनल आणि प्रशांत दामले यांचं रंगकर्मी समूह या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. या दोघांमध्ये ही लढत कोण जिंकणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वांचे लक्ष लागलेल्या निवडणुकीमध्ये नाट्यपरिषदेचं अध्यक्षपद प्रशांत दामले यांनी जिंकले आहे.

पंचवार्षिक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली आहे. प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूहाचे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा या कार्यकारिणीत समावेश आहे.

हे ही वाचा : 

शेवगाव, सातारा येथील हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिसांना केले अलर्ट

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss