spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray नंतर ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता लावणार हजेरी

आता दुसऱ्या भागात कोण येणार याची चर्चा चालू असतानाच या संदर्भातला एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची सुपरहिट मेजवानी ही सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना देखील नवं नवीन कार्यक्रम हे पाहायला मिळत आहेत अश्यातच आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर ही पडली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा नवा कार्यक्रम दिनांक ४ जुने पासून आपल्या सर्वच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray) यांनी उपस्थिती लावली आहे. तर आता दुसऱ्या भागात कोण येणार याची चर्चा चालू असतानाच या संदर्भातला एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

 आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हजेरी लावणार आहे. तर श्रेयस हा विविध किस्से या कार्यक्रमामध्ये सांगताण दिसणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक छोटासा प्रोमो हा सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. झी मराठी या वाहिनीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, श्रेयसनं त्याची एका ऑडिशनदरम्यानची आठवण सांगितली. हि आठवण सांगत असताना श्रेयस म्हणतो की, ‘मला एका सीरिअलच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं. तेव्हा मी बोलायला सुरुवात करणार तितक्यात कॅमेरामन म्हणाला, थांब. प्रॉब्लेम झाला आहे. अर्धा तास गेला तरी कॅमेरा काही केल्या सुरु होत नव्हता. तेव्हा तो कॅमेरामन मला म्हणाला ‘पनौती है ये’ मला तेव्हा वाटलं असेन मी कादाचित पनौती कारण तेव्हा कामच नव्हतं.’

तसेच आता खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये श्रेयस अजून कोणकोणते किस्से सांगणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत असंही म्हटलं जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा देखील एक प्रोमो हा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांनी उपस्थिती तर लावली आणि दुसऱ्या भागात श्रेयस तळपदे येणार हे तर आता नक्की झाले आहे.

हे ही वाचा : 

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार, अमित शाह यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

पिंपरी चिंचवड चे नाव बदलणार का ?

शिरूर लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि जयंत पाटील यांची वेगवेगळी मते

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss